TRENDING:

Maharashtra Govt Formation Mahayuti : महायुतीचा घोळ संपेना! सोमवारचा शपथविधी लांबणीवर पडणार? समोर आली मोठी अपडेट

Last Updated:

Maharashtra Mahayuti Government Formation : राज्यात विधानसभा निवडणूक निकालानंतर नव्या सरकारच्या शपथविधीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीची महत्त्वाची बैठक नवी दिल्लीमध्ये पार पडली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई :  राज्यात महायुतीला विधानसभा निवडणुकीत प्रचंड बहुमत मिळाल्यानंतरही सत्ता स्थापनेचा तिढा कायम आहे. दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शाह यांच्या उपस्थितीत महायुतीच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार सहभागी झाले होते. त्यानंतर आता भाजपकडून सत्ता स्थापन करण्याच्या प्रक्रिया वेगवान करण्यात आल्या आहेत.
महायुतीचा घोळ संपेना! शपथविधी लांबणीवर पडणार? समोर आली मोठी अपडेट
महायुतीचा घोळ संपेना! शपथविधी लांबणीवर पडणार? समोर आली मोठी अपडेट
advertisement

राज्यात विधानसभा निवडणूक निकालानंतर नव्या सरकारच्या शपथविधीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीची महत्त्वाची बैठक नवी दिल्लीमध्ये पार पडली. रात्री उशिरा एकनाथ शिंदे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांची अमित शाह यांच्यासोबत तब्बल अडीच तास बैठक झाली. या बैठकीला भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डाही उपस्थित होते. या बैठकीत मुख्यमंत्रिपद तसंच उपमुख्यमंत्रीपद आणि इतर महत्त्वाच्या खात्यांबाबत चर्चा झाली. त्यानंतर, महायुती सरकारचा शपथविधी 2 डिसेंबर रोजी पार पडणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र, हा शपथविधी 2 डिसेंबरनंतर होणार असल्याची माहिती 'सीएनएन न्यूज 18' ला सूत्रांनी दिली.

advertisement

शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसकडून आपल्या गटनेत्याची निवड करण्यात आली. मात्र, भाजपकडून अद्यापही गटनेत्याची निवड करण्यात आली नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपच्या नवनिर्वाचित आमदारांना आज संध्याकाळीच बैठकीसाठी निरोप दिले जाणार आहेत. गटनेता निवडीसाठी आमदारांना मुंबईत येण्याचे आदेश दिले जाणार आहेत. भाजपच्या विधीमंडळ गटनेत्याची निवड ही 1 डिसेंबर रोजी केली जाणार असल्याची माहिती आहे. त्यानंतर गटनेता निवडीनंतर 2 डिसेंबरला शपथ विधी होण्याची चर्चा होती.

advertisement

शपथविधीचा घोळ सुरूच

'सीएनएन न्यूज 18' ला भाजपच्या उच्चपदस्थ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपच्या गटनेता निवडीनंतर महायुतीचे नेते पुन्हा एकदा दिल्लीत येणार आहेत. गुरुवारी, रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या निवासस्थानी महायुतीच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत विविध प्रस्तावांवर चर्चा झाली. त्यानंतर महायुतीच्या नेत्यांचा सोमवारी पु्न्हा एकदा दिल्लीत चर्चेसाठी बोलावण्यात आले आहे. महायुती सरकारचा शपथविधी हा 7 डिसेंबर रोजी पूर्वी पार पडणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

advertisement

महायुतीच्या बैठकीत शिंदेंची मागणी

काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासमोर शिवसेनेची भूमिका मांडली. एकनाथ शिंदे यांनी आपल्या शिवसेनेसाठी 12 मंत्रिपदांची अमित शाह यांच्याकडे मागणी केली. त्यासोबतच विधान परिषदेच्या सभापतीपदाची देखील बैठकीत शिंदे यांच्याकडून मागणी करण्यात आली. त्याशिवाय गृह, नगरविकास यासह महत्त्वाच्या खात्यांची मागणी एकनाथ शिंदे यांनी केल्याचे सूत्रांनी दिली. पालकमंत्री पद देताना देखील पक्षाचा योग्य सन्मान राखावा अशी विनंतीही शिंदेनी अमित शाहांना केली.

advertisement

इतर संबंधित बातमी :

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
स्वतःवर विश्वास ठेवला अन् स्वप्न साकार झालं, शेतकऱ्याच्या मुलगा झाला DYSP, Video
सर्व पहा

Eknath Shinde: एकनाथ शिंदेंची भाजपकडून कोंडी? ‘‘आमची ऑफर स्वीकारा, नाहीतर…’’

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Maharashtra Govt Formation Mahayuti : महायुतीचा घोळ संपेना! सोमवारचा शपथविधी लांबणीवर पडणार? समोर आली मोठी अपडेट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल