राज्यात आजही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई, पालघर, ठाण्यासह मराठवाडा-विदर्भातही पावसाचा अलर्ट दिला आहे. नागरिकांनी समुद्र किनारी, नदीकिनारी न जाण्याचं आवाहन केलं आहे. गुरुवारी मुंबई उपनगर, पालघर, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट दिला आहे. जवळपास तीन दिवसांपासून सुरू असलेल्या अविरत पावसामुळे मुंबईत पाणी साचलं होतं. मुंबईकरांचे चांगलेच हाल झाले होते. आजही पहाटेपासून पावसाने चांगला जोर धरला आहे.
advertisement
सातारा, पुणे, कोल्हापूर, अमरावती आणि बुलढाण्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. काही जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस राहील. विदर्भात मात्र आठवड्याभराच्या मुसळधार पावसानंतर पावसाने विश्रांती घेतली आहे. जायकवाडीचे 18 दरवाजे आज उघडणार आहेत. सकाळी 6 ते 7 दरम्यान गोदावरी नदी पात्रात 9 हजार 432 क्युसेक विसर्ग होणार आहे त्यामुळे नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
कोल्हापुरात पंचगंगा नदीनं ओलांडली धोक्याची पातळी, आंबेवाडी, चिखली गावाला स्थलांतरीत होण्याच्या सूचना, जिल्हाधिकाऱ्यांकडून पूरस्थितीची पाहणी केली. जिल्हाधिकाऱ्यांनी आंबेवाडी आणि चिखली गावाला दिली भेट; संभाव्य पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवरती स्थलांतरित होण्याच्या सूचना केल्या आहेत. हवामान खात्याने शेजारील नाशिक जिल्ह्यासाठी रेड अलर्ट आणि पालघरसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे, तसेच येत्या काही तासांत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
नाशिकमध्ये गोदावरीच्या पाणीपातळीत वाढ झालीय..गंगापूर धरणातून 6340 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू असून नाशिकमध्ये गोदावरीच्या पूर परिस्थितीत वाढ झाली आहे. तर रामकुंड, गोदा घाटाचा परिसर पुराच्या पाण्याखाली गेलं आहे. उजनी धरणातून 1 लाख 10 हजार क्युसेकने भीमा नदीपात्रात पाणी सोडण्यात आला. त्यामुळे अनेक बंधारे आणि पूल पाण्याखाली गेले. इंदापूर तालुक्यातून भावड्या गारआकोलेकडे जाणारा पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली.
पुण्यात मुसळधार पावसामुळे चासकमान धरण ओव्हरफ्लो झालंय. धरणातून 24 हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय. यामुळे भिमा नदीत महापूर आलाय.दरम्यान नदीकाठच्या गावांना खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.