महाराष्ट्र आंतरजिल्हा कबड्डी चॅम्पियनशिप (MIYC) चा नवा हंगाम डिसेंबर 2025 पासून आणखी जोश, भव्यता आण व्यावसायिकतेसह रंगणार आहे. ही स्पर्धा महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसएशनचे कार्याध्यक्ष आणि माजी मंत्री गजानन कीर्तिकर आणि क्रांतीज्योती महिला प्रतिष्ठान आणि महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केली जात आहे. या स्पर्धेचा मुख्य उद्देश म्हणजे महाराष्ट्राच्या कोनाकोपर्यातील कबड्डीतील गुणी आणि होतकरू खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि त्यांना राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर झेप घेण्यासाठी प्रोत्साहन देणे हा आहे.
advertisement
स्पर्धेचे संचालक संग्राम औटी यांनी सांगतले की, यंदाची स्पर्धा शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी, पुणे येथे होणार असून, 12 जिल्ह्यांच्या संघांमध्ये एकूण 72 सामने खेळवले जाणार आहेत. MIYC ही फक्त एक स्पर्धा नसून, महाराष्ट्रामध्ये कबड्डीची पायाभरणी मजबूत करण्यासाठी आणि ग्रामीण तसेच युवा खेळाडूंना उज्ज्वल
भविष्य देण्यासाठी उचललेले एक पाऊल आहे.