मुंबई : ओबीसी समाजाची नाराजी दूर करण्यासाठी ओबीसींसाठी स्वतंत्र मंत्रिमंडळ समिती गठीत करण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी चंद्रशेखर बावनकुळे असणार आहेत. भाजपचे चार शिवसेना आणि राष्ट्रवादीचे दोन सदस्य आहेत.
ओबीसी समाजाची नाराजी दूर करण्यासाठी आजच्या कॅबिनेट बैठकीत ओबीसींसाठी मंत्रिमंडळाची उपसमिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. या उपसमितीमध्ये प्रत्येक पक्षाचे दोन सदस्य असणार आहेत. ओबीसींसाठीच्या योजना, निधी, अशा विविध मुद्यांवर ही आठा सदस्यीय उपसमिती निर्णय घेणार आहे.
advertisement
समितीमध्ये कोण कोण आहे?
आजच्या कॅबिनेट बैठकीत ओबीसींसाठी मंत्रिमंडळाची उपसमिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. या समितीचे चंद्रशेखर बावनकुळे अध्यक्ष, छगन भुजबळ, गणेश नाईक, गुलाबराव पाटील, संजय राठोड, पंकजा मुंडे, अतुल सावे, दत्तात्रय भरणे असे आठ सदस्य आहेत. ओबीसींच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक स्थितीबाबत कार्यक्रम, योजनांबाबत ही समिती कामकाज करणार आहे.
ओबीसीसाठी मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक
ओबीसी समाजासाठी मंत्रिमंडळाची उपसमिती गठीत केली जाणार असून आजच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हा महत्त्वाचा निर्णय झाल्याचे समजते. मराठा आरक्षण संदर्भात शासन निर्णय काढल्यानंतर ओबीसी समाज आक्रमक झाल्यामुळे शासनाने ओबीसी समाजाची भूमिका लक्षात घेत पाऊले उचलली आहेत. आक्रमक ओबीसी समाजाला शांत करण्यासाठी शासनाकडून मोठा निर्णय घेण्यात येत आहे. ओबीसी समाजासाठी देखील 8 सदस्यीय मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापना करण्यात येत आहे. त्यासाठी, महायुतीच्या प्रत्येक पक्षातील सदस्यांची नेमणूक करण्यात आली आहे. ओबीसी मंत्रिमंडळ उपसमिती आजच गठीत होणार असून आजच जीआर देखील काढला जाणार असल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे.
ओबीसी नेत्यांमध्ये नाराजीचे वातावरण
मराठा आरक्षणासाठी सुरू असलेले मनोज जरांगे यांचे उपोषण मंगळवारी संपले. राज्य सरकारने जरांगे यांच्या आठ पैकी 6 मागण्या मान्य केल्या. मराठा-कुणबी दाखल्याबाबत महत्त्वाचा निर्णय उपसमितीने घेतला. आंदोलनाच्या मागण्या मान्य झाल्यानंतर मराठा आंदोलकांनी आझाद मैदान आणि परिसरात जोरदार आनंद साजरा केला. मराठा आरक्षणाबाबत शासन निर्णय झाल्यानंतर आता ओबीसी नेत्यांमध्ये नाराजीचे वातावरण दिसून आले आहे. अंतरवाली सराटीत ओबीसी बांधवांचे आमरण उपोषण सुरु आहे. या उपोषणस्थळी जरांगे यांच्या मागण्यांवर सरकारने काढलेल्या जीआरची होळी करण्यात आली. त्याचबरोबर सरकरविरोधात निषेधाचा ठराव मांडण्यात आला.
हे ही वाचा :
मराठ्यांनी अंगावरचा गुलाल धुवायच्या आत ओबीसी नेते कोर्टात, मोठ्या घडामोडींना सुरुवात
ओबीसी नेते लक्ष्मण हाके आक्रमक, मराठा आरक्षणासंदर्भातील जीआर फाडला, सरकारवर सडकून टीका