देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून राज्याची सूत्रे हातात घेतल्यापासून प्रशासकीय वर्तुळात वेगाने खांदेपालट होत आहे. राज्य मंत्रिमंडळ बैठकीच्या दुसऱ्याच दिवशीच पाच बड्या सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत. बुधवारी सायंकाळी बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले.
कोणत्या ५ अधिकाऱ्यांच्या बदल्या, कुठून कुठे बदल्या?
१) संजय चव्हाण (IAS:SCS:२०११) अतिरिक्त नियंत्रक (मुद्रांक, मुंबई) यांची परभणी येथील जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
advertisement
२) रघुनाथ गावडे (IAS:SCS:२०११) जिल्हाधिकारी, परभणी यांची मुंबई येथील मुद्रांक मुंबई येथे अतिरिक्त नियंत्रक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
३) श्रीमती बुवेनेश्वरी एस. (IAS:RR:२०१५) जिल्हाधिकारी, वाशिम यांची महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ, अकोला येथील व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
४) योगेश कुंभेजकर (IAS:RR:२०१६) व्यवस्थापकीय संचालक (महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ) अकोला यांची वाशिम येथील जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
५) वर्षा मीना (IAS:RR:२०१८) यांची अकोला येथील जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
गत आठवड्यातही सात सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या
१. डॉ. अशोक करंजकर (IAS: 2009) यांची उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळ, मुंबईचे सदस्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
२. डॉ. संजय कोलते (IAS 2010) जिल्हाधिकारी, भंडारा यांची शिवशाही पुनर्वसन प्रकल्प मुंबईचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
३. सुशील खोडवेकर (IAS: 2011) सदस्य सचिव, उर्वरित महाराष्ट्र विकास मंडळ मुंबई यांना विकास आयुक्त (असंघटित कामगार), मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
४. सावन कुमार (IAS 2019) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नंदुरबार यांची जिल्हाधिकारी, भंडारा म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
५. नमन गोयल (IAS 2022) प्रकल्प अधिकारी, ITDP, भामरागड आणि सहाय्यक जिल्हाधिकारी, अटापली उपविभाग, गडचिरोली यांना [मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नंदुरबार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
६. डॉ.जी.व्ही.एस. पवनदत्त (IAS 2023) सहाय्यक जिल्हाधिकारी, देसाईगंज उपविभाग, गडचिरोली यांची सहायक जिल्हाधिकारी, इगतपुरी उपविभाग, नाशिक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
७. श्रीमती लघिमा तिवारी (IAS 2023) सहायक जिल्हाधिकारी, बल्लारपूर उपविभाग, चंद्रपूर यांची सहायक जिल्हाधिकारी, गोंडपिंपरी उपविभाग, चंद्रपूर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.