गेल्या काही महिन्यांपासून मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरला आहे. सरकारकडून अद्याप ठोस निर्णय न झाल्यामुळे अनेक ठिकाणी आंदोलने सुरूच आहेत. या पार्श्वभूमीवर सामान्य कार्यकर्त्यांपासून विविध पदाधिकारी, जनप्रतिनिधी आंदोलनाला आपला पाठिंबा दर्शवत आहेत. या आंदोलनात ग्रामपातळीवरील महिला नेत्यांनीही पुढाकार घेतला आहे. त्यात आता सखुबाई खोत यांचा समावेश झाला आहे.
धाडसी निर्णयाचे गावकऱ्यांसह मराठा समाजाकडून स्वागत
advertisement
सखुबाई खोत या वेखंडवाडी येथील उपसरपंच पदावर कार्यरत होत्या. मात्र, समाजाच्या न्याय्य मागणीसाठी आपला राजीनामा देत करून त्यांनी जाहीर आरक्षण लढ्याला पाठिंबा दिला आहे. त्यांचा राजीनामा सरपंच संतोष खोत यांनी स्वीकारला आहे. त्यांच्या या धाडसी निर्णयाचे गावकऱ्यांसह मराठा समाजाने स्वागत केले असून त्यांचे कौतुक होत आहे.
राज्य सरकारवरील दबाव वाढण्याची शक्यता
मराठा समाजासाठी सुरू असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला सातत्याने विविध स्तरांतून पाठींबा मिळत आहे. यात ग्रामपंचायत पातळीवरील राजकीय पदाधिकारीही आता राजीनाम्याच्या मार्गाने आंदोलनात उतरू लागल्याने राज्य सरकारवरील दबाव वाढण्याची शक्यता आहे. ग्रामीण भागातील महिला नेत्या असूनही सखुबाई खोत यांनी समाजाच्या हितासाठी पदाचा त्याग केला, अशा प्रतिक्रिया मराठा बांधवांकडून येत आहे.
गावाकऱ्यांनी दिला जाहीर पाठींबा, सगळेचं करतायतं कौतुक
गावातील अनेक नागरिकांनी त्यांच्या या निर्णयाला पाठिंबा दर्शवला असून, "आरक्षण मिळवण्यासाठी गरज भासली तर आम्हीही आंदोलनासाठी सज्ज आहोत," अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. मराठा समाजात ऐक्य वाढवण्यासाठी आणि आंदोलनाला बळकटी मिळवून देण्यासाठी सखुबाई खोत यांचा राजीनामा मोलाचा ठरत असल्याची भावना व्यक्त केल्या आहे. त्यामुळे आगामी काळात आणखी ग्रामपातळीवरील पदाधिकारी अशाच प्रकारे आंदोलनाला पाठींबा देतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
हे ही वाचा :
हायकोर्टाने सरकारला सुनावलं, मनोज जरांगेंच्या वकिलांना सूचना; उच्च न्यायालयात खडाजंगी, काय काय घडलं?
आता थांबायचं नाय! मुंबई महापालिकेचा मराठा आंदोलकांसाठी मोठा निर्णय, 24 तास मिळणार 'या' गोष्टी