मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारला सर्व मागण्यांची अंमलबजावणी करण्याचे आवाहन केले आहे. मुंबईत सुरू असलेल्या या आंदोलनादरम्यान त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. जोपर्यंत सगळ्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत उपोषण सोडणार नाही असं आपल्या निर्णयावर ठाम असल्याचं सांगितलं आहे.
advertisement
जरांगे यांनी आंदोलकांना शांतता राखण्याचे आणि वाहतूक कोंडी टाळण्याचे आवाहन केले आहे. ते म्हणाले की, "गोरगरीब मराठ्यांना सन्मान द्या, त्यांचा अपमान करू नका." तसेच, त्यांनी सरकारवर महाराष्ट्रात गैरसमज पसरवत असल्याचा आरोपही केला. "आम्ही ओबीसींच्या 30 टक्के आरक्षणातून 20 टक्के आरक्षण मागत नाही. आम्ही फक्त आमच्या नोंदी ओबीसी आरक्षणामध्ये घ्या, अशी मागणी करत आहोत. मराठा आणि कुणबी एकच आहेत, त्यामुळे कोणताही संभ्रम निर्माण करू नका," असेही त्यांनी स्पष्ट केले.
जरांगे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका करताना म्हटले की, "मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आरक्षण द्यायचं नाही, तर फक्त राजकारण करायचं आहे." यावर प्रतिक्रिया देताना, "आम्हाला राजकारण नको, फक्त आरक्षण हवे आहे," असे त्यांनी ठामपणे सांगितले. त्यांनी आंदोलकांना पोलिसांनी सांगितलेल्या ठिकाणी आपली वाहने सुरक्षितपणे उभी करण्याचे आणि संयम राखण्याचे आवाहन केले. "सगळी मुंबई मराठा झाली आहे. शांत राहा आणि आपण वाट पाहू," असे म्हणत त्यांनी आंदोलकांना शांततेत आंदोलन करण्याचे आवाहन केले. "आम्ही हक्काचे आरक्षण मागत आहोत," असे सांगत त्यांनी आपली भूमिका पुन्हा एकदा अधोरेखित केली.
गोंधळ घालणाऱ्यांचा उद्देश काय आहे मला माहिती नाही. तुम्ही आंदोलनाची दिशा शांततेत ठेवा. बघुया किती दिवस हे असं ठेवातात. खरंच आपल्याला आरक्षण देतात की नाही. सीएसएमटीबाहेर मराठा आंदोलकाकडून दोन तासापासून आंदोलन. सीएसएमटी रेल्वे स्थानकातही आंदोलकांचा गोंधळ, सोयीसुविधा देणं पालिकेचं काम आहे. मुख्यमंत्र्यांचं ऐकून पाणी, दुकानं बंद केलं हे लक्षात ठेवू. होऊदे हाल, बघु किती दिवस हाल करतात.
मराठ्यांचा संयम बघू नका. मुख्यमंत्र्यांनी वेठीस धरू नये, तुम्हाला ही योग्य संधी आहे. तुम्ही संधीचं सोनं करा, मराठ्यांचा संयम पाहून नका आणि वेठीला धरू नका. तुम्ही जर पोरांना हाणलं, तर तुमच्या आयुष्यातला सगळ्यात वाईट दिवस असेल. तुम्ही अडचणीत याल आणि मोदी आणि शाह पण अडचणीत येईल हे ध्यानात ठेवा असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला. तुमच्यामुळे डाग लागेल. लोकांचं जेवढं वाटोळं होईल तेवढं फडणवीस पाहणार हे दिसतंय, महाराष्ट्र अस्थिर करायचा, पोलिसांना लाठीचार्ज करायला लावायचा, वातावरण दुषित करायचं हे त्यांचं काम आहे असं म्हणत मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप देखील केले आहेत.