TRENDING:

Manoj Jarange: अखेर मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं, या कारणामुळे घेतली माघार

Last Updated:

मराठा आरक्षणातील वेगवेगळ्या मागण्यासाठी उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील यांनी अखेरीस उपोषण सोडलं आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
जालना: मराठा आरक्षणातील वेगवेगळ्या मागण्यासाठी उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील यांनी अखेरीस उपोषण सोडलं आहे. प्रकृती खालावल्यामुळे जरांगेंनी उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला. गावकऱ्यांच्या हस्ते ज्यूस पिऊन जरांगेंनी उपोषण सोडलं. पण उपोषण सोडण्याआधी जरांगेंनी सरकारला 13 ऑगस्टपर्यंतचा अल्टीमेटम दिला आहे. सरकारने मागण्या मान्य कराव्यात, अशी मागणीही त्यांनी केली आहे. आता उपोषण सोडून लोकांमध्ये जाणार असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
News18
News18
advertisement

मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटीमध्ये उपोषणाला बसले होते. आज पाचव्या दिवशी उपोषण सोडलं. पण उपोषण व्यवस्थित चाललं मात्र बुधवारी रात्री शुगर 58 झाली, तर बीपी पण 70 होता. त्यामुळं रात्री त्रास होत होता. सकाळी डॉक्टरांनी सल्ला दिला होता की उपोषण सोडावे लागेल. त्यानंतर जरांगेंनी यांनी सकाळी उपोषणाला स्थगिती देणार अशी घोषणा केली. दुपारी गावकऱ्यांच्या हस्ते जरांगेंनी ज्यूस घेऊन उपोषण सोडलं. यावेळी त्यांनी सरकारवर सडकून टीका केली.

advertisement

मात्र रात्री आपल्या लोकांनी धरलं मला आणि सलाईन लावलं. तुमची माया मला काही बसू देत नाही. तुम्ही असले तर मराठा समाज एकजुट राहिल तुम्ही पाहिजेत आणि तुम्ही उपोषण सोडा असं मराठा बांधवांचं म्हणणं होतं. उपोषण ही माझी शक्ती आहे त्यालाच ते घाबरतात. माझ्या उपोषणामुळं समाजाला काहीही काही तरी मिळालंय मी माझ्या समाजाच्या कामी जीवन लावलं आहे. सलाईन लावलं असंच बसण्यापेक्षा उपोषण सोडलेलं बरं. तुम्ही सांगा काय करायचं आहे तर हे आमरण उपोषण स्थगित करून टाकू. आता पुढची तयारी करायची आहे. हा मंडपही काढून ठेवा काहींना हे मोकळं पाहिजे. पैठण फाट्यावर कार्यालय करून काम चालू करू. या गावाचं लई मोठं योगदान आहे, पहिला गुलाल अंतरवालीतून सुरु होईल हा शब्द आहे, असंही जरांगे म्हणाले.

advertisement

थोड्या फार गावात अंधारात कुरापती सुरू आहेत. आता मी चाळीस एक आमदार पाडायची तयारी करतोय. आपले प्रश्न मांडायला विधानसभेत कुणी नाही. त्यामुळं आपले चाळीस पन्नास वाघ पाहिजेत. आजपासून मी कुणाच्याच टीकेला उत्तर देणार नाही मात्र गेम लावतो पाडापाडची. समाजाचंही म्हणणं आहे की तुम्ही तयारीला लागा. चला आता समाजाच्या वतीनं 13 ऑगस्टपर्यंत वेळ दिला, असं म्हणत जरांगेंनी सरकारला अल्टीमेटम दिला.

advertisement

'मला जेलमध्ये मारून टाकायचं यांना'

'आमच्याकडं यायला मंत्रीच राहिला नाही. शंभुराजे महानाट्य दाखवलं होतं त्यात तोटा आला तर दगड घालतो का आता. मी पैसे दिले तरी आमच्या गळ्यात गुंतवलं. 13 वर्ष झालं काहीच नव्हतं आता एकाएकी वॉरंटच आलं. नोटीस न देता मला वॉरंट जारी करण्यात आलं. मी आमदारकीला वाळुन फेकून देतो. हे मला मॅनेज करायचं बघत आहेत. मला जेलमध्ये आत मारून टाकायचं आहे. भाजपची एकही सीट आली नाही पाहिजे, तुम्ही जिवंत आहेत तोपर्यंत. फडणवीसांना काय करायचं तर करु द्या मी भीत नाही. बघु कसा नेतो जेलमध्ये तर बघू

advertisement

त्या आरोपांवर उत्तर

'सांस्कृतिक मंत्रालयाला पैसे भरायला जमत नाही का. मी काय वाईट केलं. चला टाका मला जेलमध्ये. मला गुंतवण्यासाठी यांनी अभियान सुरू केलं. मी जेलमध्ये जायला तयार आहे कारण मी शंभु राजेंचा इतिहास दाखवला. फडणवीस यांनी मला आतमध्ये गोळ्या घालायला तयार आहे. मात्र मीही मागं हटत नाही मरायला तयार आहे. बाकीचे देवबप्पा चांगले आहेत राव. हे देवबप्पा मला जेलमध्येच टाकायचं बघतात, असंही जरांगे म्हणाले.

नितीन गडकरींचं केलं कौतुक

'नितीन गडकरींसारखा माणूसच नाही. ज्या खात्यात जाईल तिथून पाणीच काढीन. सगळ्या जाती एकत्र झाल्या तरी मराठा यांचे 40-50 आमदार पाडू शकतो. ज्याला जनमत नाही त्याला फडणवीस मागच्या दारातून पाठवतो, अशी टीकाही जरांगेंनी केली.

देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप

मला नाही राजकारणात जायचं नाही. जेवढे विधानपरिषदेवर गेलेले आहेत ते फक्त मला बोलायला ठेवले. मात्र हे भाजप संपायला बसले आहेत. मी मॅनेज होत नाही म्हणून मला आत टाकत आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी मुंडे घराण्याला वनवास करायला लावला. फडणवीसांनी मुंडे साहेबांचं, महाजन साहेबांचं घराणं संपवलं. देवेंद्र अप्पा मी भित असतो का? तुम्हाला मराठी कळत नाही का? बिगर मिशीवाले लावतील मागे. सगळ्या विधान परिषदेला नापास उताडा आहे, मी जर जेलमध्ये गेलो तर भाजपचं एकही सीट येवू देवू नका, असं आवाहनही जरांगेंनी केलं.

'बिगर मिशी वाल्याला मावशीला शेवटचं सांगनं आहे. दरेकर तुला पश्चाताप होईल माझ्या नादी लागू नको, अशा इशाराही जरांगेंनी भाजपचे आमदार प्रवीण दरेकरांना दिला.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Manoj Jarange: अखेर मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं, या कारणामुळे घेतली माघार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल