वडीगोद्रीत ओबीसी आंदोलकांकडून रास्तारोको करण्यात आला. तिथे तणावाची स्थिती निर्माण झाली होती. पण आता वातावरण निवळले आहे. आंदोलकांनी रास्ता रोको केल्यानंतर पोलिसांसोबत हुज्जतही घातली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारी म्हणून पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे.
दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ जालना जिल्ह्यात रविवारी बंदची हाक दिली आहे. मराठा समाजाकडून ही बंदची हाक देण्यात आली आहे. जालन्यासोबत परभणीतही बंदची हाक दिली आहे. शहरासह जिल्ह्यात बाजारपेठांमध्ये शुकशुकाट दिसून येत आहे. बंद शांततेत पार पाडावा असे आवाहन सकल मराठा समाजाने केले आहे. पुण्यातही बंद पुकारला असून ग्रामीण भागात बंदला प्रतिसाद मिळत आहे. वाघोली आणि आळंदी परिसरात बंदमुळे शुकशुकाट आहे. मागण्या पूर्ण करतो म्हणून आश्वासन देणाऱ्या सरकारने फसवल्याचा आरोप करत ,जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ कडकडीत बंद ठेवत असल्याचं मराठा आंदोलकांचा म्हणणे आहे.
advertisement