मी मरेपर्यंत मुंबई सोडणार नाही, असंही मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे. जरांगे यांच्या भूमिकेनंतर मुंबई पोलीस आणि सरकार काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. यावेळी मनोज जरांगे यांनी मराठा आंदोलकांना शांत राहण्याचं आवाहन केलं आहे. सर्वांनी हायकोर्टाच्या नियमांचं पालन करावं, असंही आव्हान केलं आहे.
मनोज जरांने नेमकं काय म्हणाले?
advertisement
मराठा आंदोलकांना संबोधित करत असताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, "माझी कितीही तब्येत खराब झाली, तरी शांत राहायचं. येड्यासारखं करायचं नाही. मला माहीत आहे, तुम्हाला माझी माया आहे. मलाही तुमची माया आहे. कितीही त्रास झाला तरी तुम्ही शांत राहायचं. मी मेल्याच्या नंतरही तुम्ही शांतच राहायचं, असं माझं तुम्हाला आवाहन आहे. माझ्या मृत्यूनंतर तुम्हाला काय करायचं ते तुम्ही करा. पण तरीही माझं म्हणणं आहे की, तुम्ही शांत राहा."
आपल्याला मराठा आरक्षणाची ही लढाई शांततेत लढायची आहे आणि जिंकायची आहे. काहीही झालं तरी मी हटणार नाही. हे मी देवेंद्र फडणवीसांना ठासून सांगतो. मी मरेपर्यंत मुंबई सोडणार नाही. फक्त न्यायालयाच्या सगळ्या नियमांचं पालन आपल्या पोरांनी करावं, अशी माझी इच्छा आहे. पुढच्या सोमवारपर्यंत मी काही जगत नसतो, शनिवारी रविवारी सगळे मराठे मुंबईत या. कुणी कितीही आडवलं तरी मराठ्यांनी मुंबईत यावं. शनिवार आणि रविवार लोक जर मुंबईत आले. तर सोमवारी आंदोलन ही मस्त होईल, असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले.