मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलीच्या वडिलांची तब्येत बिघडल्याने त्या तरुणीने मदतीसाठी युसूफ इलियास याच्याकडे धाव घेतली होती. मात्र, या मदतीच्या नावाखाली तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार करण्यात आल्याचा गंभीर आरोप पीडितेने केला आहे. घटनेनंतर पीडितेला मोठा धक्का बसला मात्र तिने थेट पोलिसांकडे धाव घेतली. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी तत्काळ गुन्हा नोंदवून युसूफ इलियासला ताब्यात घेतलं.
advertisement
घटनेचे अनेक धागेदोरे समोर येण्याची शक्यता
या प्रकरणी आरोपीला आज न्यायालयात हजर करण्यात आलं. सुनावणीनंतर न्यायालयाने त्याला 3 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. पुढील तपासादरम्यान या घटनेतील अनेक धागेदोरे समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, आरोपी हा आमदार मुफ्ती इस्माईल यांचा निकटवर्तीय आणि कट्टर समर्थक असल्याने या घटनेला राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. स्थानिक राजकीय वर्तुळात या प्रकरणाची जोरदार चर्चा असून, आमदार समर्थकाच्या कृत्यामुळे एमआयएम पक्षाची प्रतिमा धुळीस मिळाल्याची चर्चा सुरू आहे.
मोबाईल फोनसह इतर पुरावे जप्त
पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलीवरील गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्यामुळे तपास जलद गतीने केला जात आहे. आरोपीच्या मोबाईल फोनसह इतर पुरावे जप्त करण्यात आले असून, तपासातून अजून काही महत्त्वाची माहिती मिळू शकते. मालेगाव शहरात या घटनेने संताप व्यक्त केला जात आहे. सामाजिक संघटनांसह नागरिकांनी अशा अमानुष कृत्याचा निषेध केला आहे. आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणीही विविध स्तरांतून पुढे येत आहे.