TRENDING:

Nagpur News : मतदानानंतर नागपुरात राडा, ईव्हीएम घेऊन जाणाऱ्या एसयूव्ही कारवर हल्ला

Last Updated:

Nagpur Elections : नागपूरच्या किल्ला परिसरात ईव्हीएम घेऊन जाणाऱ्या वाहनावर हल्ला केल्याची गंभीर घटना घडली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
वृषभ फरकुंडे, प्रतिनिधी, नागपूर :  मतदानाची प्रक्रिया संपल्यानंतर नागपूरमध्ये धक्कादायक घटना घडली. नागपूरच्या किल्ला परिसरात ईव्हीएम घेऊन जाणाऱ्या वाहनावर हल्ला केल्याची गंभीर घटना घडली. या घटनेनंतर दक्ष नागरिक आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी हस्तक्षेप करत पोलिसांना बोलावलं. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचत कर्मचाऱ्यांना गाडीतून सुखरुप बाहेर काढलं.
ईव्हीएम नेणाऱ्या वाहनावर हल्ला, नागपूरमधील धक्कादायक घटना, कर्मचाऱ्यांची सुखरुप सुटका
ईव्हीएम नेणाऱ्या वाहनावर हल्ला, नागपूरमधील धक्कादायक घटना, कर्मचाऱ्यांची सुखरुप सुटका
advertisement

वाहनावर हल्ला

नागपुरात अत्यंत गंभीर घटनेत ईव्हीएम घेऊन जाणाऱ्या चार चाकी वाहनावर हल्ला करून त्या वाहनाची मोडतोड करण्यात आली आहे. मध्य नागपूर विधानसभा क्षेत्रातील किल्ला परिसरातील बुथ क्रमांक 268 च्या जवळ बुधवारी संध्याकाळी 7 ते 7.30 वाजताच्या दरम्यान ही घटना घडली आहे. जेव्हा किल्ला परिसरात बुथ क्रमांक 268 वरून ईव्हीएम घेऊन जाणारी तवेरा एसयुव्ही मतदान केंद्रातून बाहेर निघाली, तेव्हा त्या गाडीवर हल्ला करण्यात आला.

advertisement

त्यावेळेस परिसरातील दक्ष नागरिक आणि काही भाजप कार्यकर्त्यांनी हस्तक्षेप केले आणि पोलिसांना बोलावले. मात्र तोवर दगड आणि लोखंडी रॉड्सने हल्ला करत evm घेऊन जाणाऱ्या तवेरा कारची जबर मोडतोड करण्यात आली होती.

ईव्हीएम सुरक्षित...

पोलिसांनी माहिती मिळताच लगेच घटनास्थळी धाव घेतली आणि ईव्हीएम तसेच तवेरा एसयुव्हीमधील सरकारी कर्मचाऱ्यांना सुरक्षित बाहेर काढले. मोडतोड करण्यात आलेली तवेरा एसयुव्ही कार पोलिसांनी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये आणली. त्यानंतर ईव्हीएम आणि सरकारी कर्मचाऱ्यांना सुरक्षितरित्या त्यांच्या निश्चित ठिकाणी पोहोचवले आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
अतिवृष्टीचा फटका, बबन यांच्या सीताफळाचे मोठं नुकसान, खर्च निघणे झालं अवघड
सर्व पहा

या घटनेनंतर कोतवाली पोलीस स्टेशन समोर मोठ्या संख्येने भाजप आणि काँग्रेस कार्यकर्ते गोळा झाले होते. मात्र वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी कोतवाली पोलीस स्टेशनकडे धाव घेत सर्व कार्यकर्त्यांची गर्दी कमी केली. या हल्ल्यामागे काँग्रेस कार्यकर्त्यांचा हात असल्याचे म्हटले जात आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Nagpur News : मतदानानंतर नागपुरात राडा, ईव्हीएम घेऊन जाणाऱ्या एसयूव्ही कारवर हल्ला
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल