मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या भांडूप परिसरात स्त्री जातीचं अर्भक चक्क शौचालयात फेकल्याची घटना घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या बाळाची नाळ देखील कापलेली आणि बाळाच्या डोक्याला दुखापत झाली होती.भांडुपच्या तुलशेत पाडा परिसरातील पाटकर कंपाउंडमध्ये हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
पाटकर कंपाउंड मधील एका सार्वजनिक शौचालयात नुकतच जन्मलेलं स्त्री जातीचा अर्भक सापडलं होतं. शौचालयामध्ये एका कमोडमध्ये या अर्भकाला टाकण्यात आलं होतं. या बाळाच्या डोक्याला दुखापत झाली होती आणि नाळ ही कापली गेली नव्हती. या दरम्यान परिसरातील महिला शौचालय वापरण्यासाठी गेल्या असता ही घटना उघडकीस आली होती.
advertisement
महिलांना ही घटना कळताच त्यांनी तत्काळ या बापाला भांडुप पोलीस ठाणे येथे नेलं आणि त्यानंतर वैद्यकीय उपचारांसाठी अर्भकाला राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. सध्या अर्भकाची प्रकृती स्थिर आहे.
स्थानिक अजय पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्रीच आम्हाला हे बाळ मिळालं होतं. त्यामुळे आधी आम्ही त्याला डॉक्टरकडे घेऊन गेलो.त्यानंतर डॉक्टरांनी बाळाची नाळ कापली आणि डोक्याला मलमपट्टी केली होती.त्यानंतर आम्ही सकाळी बाळाला भांडुप पोलीस ठाण्यात नेल. पोलिसांनी नंतर या अर्भकाला राजावाडी रुग्णालयात दाखल केलं आहे.
दरम्यान आता हे अर्भक तिच्या निर्दयी मातेने टाकलं आहे की? इतर कोणी हे अर्भक टाकलं आहे? या बाळाचे आई वडिल कोण आहेत?या सर्व अंगाने पोलिसांनी तपास सूरू केला आहे. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे.