Solapur Flood: भाजी विकून एक-एक वस्तू गोळा केली, सीनाच्या पुराण सगळंच गेलं वाहून, नंदाबाईना अश्रू अनावर, Video
- Published by:Mohan Najan
- Reported by:Patel Irfan Hassan
Last Updated:
नंदाबाई पुरी यांच्या घरातील संसारोपयोगी साहित्य वाहून गेले. भाजीपाला विक्री करून नंदाबाई यांनी एक-एक वस्तू गोळा केली होती, पण या महापुरामध्ये जमा केलेल्या वस्तू वाहून गेल्या आहेत.
सोलापूर : सीना नदीकाठी असलेल्या उत्तर सोलापूर तालुक्यातील तिऱ्हे गावाला महापुराचा जबरदस्त फटका बसला आहे. कोळेगाव वीर धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे सीना नदी दुथडी भरून वाहत होती. तिऱ्हे गावात राहणाऱ्या नंदाबाई पुरी यांच्या घरातील संसारोपयोगी साहित्य वाहून गेले. भाजीपाला विक्री करून नंदाबाई यांनी एक-एक वस्तू गोळा केली होती, पण या महापुरामध्ये जमा केलेल्या वस्तू वाहून गेल्या आहेत.
उत्तर सोलापूर तालुक्यातील तिऱ्हे गावात राहणाऱ्या नंदाबाई पुरी यांचा भाजीपाला विक्रीचा व्यवसाय आहे. तर नंदाबाई यांच्या पतीचे 25 वर्षांपूर्वी निधन झाले आहे. भाजीपाला विक्री करून स्वतःचे घर बांधले, घरातील संसारोपयोगी साहित्य घेतले. सीना नदीला अचानकपणे पूर आल्याने तिऱ्हे गावातील नागरिकांना घरदार सोडून स्थलांतर व्हावे लागले. गेल्या 50 वर्षांपासून नंदाबाई तिऱ्हे गावात राहण्यास आहेत. पन्नास वर्षांमध्ये नंदाबाई यांनी सीना नदीला आलेला महापूर कधीच बघितला नव्हता. पहिल्यांदाच सीना नदीला इतके पाणी बघितले आहे.
advertisement
तिऱ्हे गावातील स्टॅंड परिसरात नंदाबाई भाजीपाला विक्री करण्याचा व्यवसाय करतात. नदीला महापूर आल्याने घरात साठवलेले अन्नधान्य, संसारोपयोगी साहित्य आदी वस्तू सीना नदीला आलेल्या महापुरात वाहून गेले. तर सीना नदीला आलेल्या महापुरामध्ये अख्खा गाव पाण्याखाली गेला होता. सीना नदीचे पाणी ओसरल्यानंतर घराची विदारक अवस्था पाहून नंदाबाई यांना अश्रू अनावर झाले आहेत.
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
October 01, 2025 7:01 PM IST
मराठी बातम्या/सोलापूर/
Solapur Flood: भाजी विकून एक-एक वस्तू गोळा केली, सीनाच्या पुराण सगळंच गेलं वाहून, नंदाबाईना अश्रू अनावर, Video