Sahyadri Tiger Reserve : सह्याद्री व्याघ्रप्रकल्पात 'ऑपरेशन तारा', वाघोबांची संख्या वाढणार, हे आहे कारण
- Published by:Mohan Najan
- Reported by:Niranjan Sherkar
Last Updated:
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील वाघांची संख्या वाढवण्यासाठी राज्य वनविभागाने ऑपरेशन तारा या महत्त्वाकांक्षी योजनेला सुरुवात केली आहे.
पुणे : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील वाघांची संख्या वाढवण्यासाठी राज्य वनविभागाने ऑपरेशन तारा या महत्त्वाकांक्षी योजनेला सुरुवात केली आहे. सध्या या प्रकल्पात केवळ तीन नर वाघ अस्तित्वात आहेत. त्यांची संख्यात्मक वाढ व्हावी आणि व्याघ्र प्रकल्पाचे संवर्धन व्हावे या उद्देशाने वनविभागाने इतर जंगलातून तब्बल 8 वाघ सह्याद्रीत आणण्याचा निर्णय घेतला आहे.
सह्याद्री व्याघ्रप्रकल्पात वाघांची संख्या वाढावी यासाठी ऑपरेशन तारा राबवण्यात येणार आहे. सध्या ह्या व्याघ्रप्रकल्पात असलेल्या तीन वाघांच्या जोडीसाठी ताडोबा आणि पेंच अंधारी व्याघ्रप्रकल्पातून दोन मादी वाघ आणले जाणार आहेत. इतर जंगलांतून सह्याद्री व्याघ्रप्रकल्पात 8 वाघ देखील आणले जाणार आहेत. तर पहिल्या टप्प्यात 2 वाघिणी डिसेंबर महिन्याच्या अखेरीस दाखल होणार आहेत.
advertisement
चांदोली अभयारण्य परिसरातील महाबळेश्वर ते राधानगरी हा भाग सह्याद्री व्याघ्र प्रकल्प म्हणून ओळखला जातो. 5 जानेवारी 2010 पासून हा भाग व्याघ्रप्रकल्प म्हणून जाहीर करण्यात आला होता.
8 वाघांचे होणार स्थलांतर
सह्याद्री व्याघ्रप्रकल्पात ताडोबा आणि अंधारी व्याघ्र प्रकल्पातून 8 वाघांना स्थलांतरित करण्यास केंद्रीय वन मंत्रालयाने परवानगी दिली आहे. या 8 स्थलांतरित वाघांमध्ये 3 नर आणि 5 मादी वाघांचा समावेश आहे. पहिल्या टप्प्यात 2 मादी वाघांचे स्थलांतर डिसेंबर महिन्यात करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
advertisement
स्थानिक लोकांना मिळणार रोजगार
चांदोली अभयारण्याचा समावेश असलेल्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामुळे या परिसराला पर्यटनाच्या दृष्टीने देखील मोठे महत्त्व प्राप्त होणार आहे. यामुळे स्थानिक नागरिकांना रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
October 01, 2025 4:58 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Sahyadri Tiger Reserve : सह्याद्री व्याघ्रप्रकल्पात 'ऑपरेशन तारा', वाघोबांची संख्या वाढणार, हे आहे कारण