मुंबई, मुंबई उपनगर, पालघर, रायगड, ठाणे यासह अनेक भागांसाठी पुढील 3 तासात खूप महत्वाचे आहेत. कारण या भागात काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी आणि सतर्क राहावे असे आवाहन राज्य आपत्कालीन केंद्राने केले आहे.
दरम्यान हवामान विभागाने हा इशारा देण्याआधीच आज दुपारी आणि नुकताच संध्याकाळच्या सुमारास अंधेरी जुहू, लोअरपरळ किंवा ठाणे भागात मुसळधार पाऊस पडलेला आहे. आता या पावसाने पुन्हा याच भागांना मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे,त्यामुळे नागरीकांनी काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे.
advertisement
मुंबई प्रादेशिक हवामान विभागाचे माजी उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी देखील पावसाबाबत मोठी अपडेट दिली आहे.मुंबई आणि आसपास अंशतः ढगाळ हवामान आहे. त्यामुळे पुढील 3-4 तासांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मुंबईसह पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पुढील 3-4 तासांत काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे,अशी माहिती त्यांनी दिली आहे.
विदर्भ मराठवाड्याला यलो अलर्ट
विदर्भातील सर्व तर मराठवाड्यातील चार जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे.विदर्भात गळ्याच जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. विदर्भातील सर्व 11 जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. विदर्भात पुढील तीन दिवस पाऊस सक्रिय राहणार आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सांगली जिल्ह्यात हलक्या तर कोल्हापूर, सातारा आणि सोलापूरमध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उत्तर महाराष्ट्रातील नाशिकच्या घाट परिसरात मध्यम तर नंदुरबार, धुळे, अहिल्यानगर, जळगाव आणि नाशिक जिल्ह्यात हलक्या पावसाची शक्यता आहे. कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 25 अंश सेल्सिअस दरम्यान राहील.
मराठवाड्यात चार जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. परभणी, हिंगोली, लातूर आणि नांदेड या चार जिल्ह्यांना यलो अलर्ट असून उर्वरित जिल्ह्यात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. दसऱ्याला मुंबईत ढगाळ आकाशासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. तर कमाल तापमान 31 तर किमान तापमान 25 अंश सेल्सिअस एवढे राहील. कोकणात देखील अशीच परिस्थिती पाहायला मिळेल.