TRENDING:

Nagpur Accident : दुचाकीस्वाराला वाचवायला गेला अन् अनर्थ घडला, भीषण अपघाताने नागपूर हादरलं, किती जणांचा मृत्यू?

Last Updated:

नागपूरमधून एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. यामघ्ये तीन वाहनांचा विचित्र अपघात झाल्याची घटना घडली आहे.खाजगी बस चालक एका दुचाकी स्वाराला वाचवायला गेल्यामुळे ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Nagpur Accident Story : नागपूरमधून एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. यामघ्ये तीन वाहनांचा विचित्र अपघात झाल्याची घटना घडली आहे.खाजगी बस चालक एका दुचाकी स्वाराला वाचवायला गेल्यामुळे ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे. नागपूर वर्धा राष्ट्रीय महामार्गावर ही विचित्र अपघाताची घटना घडली आहे. या घटनेमुळे वाहतूक खोळंबली होती.दरम्यान कोणती जिवितहानी झाली आहे का? याची माहिती मिळू शकली नाही आहे.
 nagpur accident news
nagpur accident news
advertisement

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वर्ध्यातून दोन बस (एक एसटी एक खाजगी बस) आणि ट्रक नागपूरच्या दिशेने प्रवास करत होते. ही तिन्ही वाहने भरधाव वेगाने धावत असताना खाजगी बस चालकासमोर एक दुचारीस्वार आला होता. या दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात हा अपघात होऊन बसल्याची घटना घडल्याची माहिती आहे.

वर्ध्यातून दोन बस आणि ट्रक भरधाव येत असताना समोरून चुकीच्या दिशेने एक दुचाकीस्वार आला होता. खाजगी बस चालकाने या दुचाकीस्वाराल वाचवण्यासाठी अर्जंट ब्रेक मारला होता.त्यामुळे खाजगी बस जागच्या जागीच थांबली होती. पण मागून येणाऱ्या एसटी बसला आणि ट्रकला अंदाज न आल्याने त्या एकमेकांवर आदळल्या. यात पहिल्यांदा एसटी बसने खाजगी बसला धडक दिली. या धडकेनंतर मागून येणाऱ्या ट्रकने बसला भीषण धडक दिली.या धडकेत एसटी बसचा पुढचा आणि मागच्या भागाचा अक्षरश चुरांडा झाला.ट्रक चालकाचा देखीव पुढचा भाग चेंपला गेला. खाजगी बसला देखील भयंकर नुकसान झाले.

advertisement

दरम्यान या बससमोर येणाऱ्या बाईकस्वाराचे नेमके काय झाले? याची माहिती मिळू शकली नाही आहे.पण या बाईकस्वारामुळे - नागपूर वर्धा राष्ट्रीय महामार्गावर विचित्र अपघात झाला आहे.या अपघातात जीवितहानी झाली आहे की नाही?याची अद्याप कोणतीच माहिती समोर आलेली नाही आहे. पण वाहनांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

या अपघातामुळे महामार्गावर प्रचंड वाहतूक खोळंबली होती.त्यामुळे पोलिसांनी अपघातानंतर तत्काळ घटनास्थळी दाखल होऊन वाहतूक सूरळीत करून दिली. या अपघाताच्या घटनेने एकच खळबळ माजली आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Nagpur Accident : दुचाकीस्वाराला वाचवायला गेला अन् अनर्थ घडला, भीषण अपघाताने नागपूर हादरलं, किती जणांचा मृत्यू?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल