'बाबु छत्री' उर्फ प्रियांश छत्री याची मंगळवारी मध्यरात्री हत्या झाल्याची घटना घडली आहे. या घटनेने मनोरंजन विश्वासह नागपूरमध्ये शोककळा पसरली आहे. या प्रकरणात पोलीस निरीक्षक अरूण क्षीरसागर यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री'बाबु छत्री' त्याच्या घरातच बसला होता.त्यानंतर रात्री 10:30 वाजताच्या सुमारास ध्रुव साहू नावाचा मित्र त्यांच्या घरी आला आणि तो बाबू छत्रीला घेऊन गेला. ज्यावेळे साहु बाबू छत्रीला घरातून घेऊन गेला त्यावेळस तो पुर्णत नशेत होता. त्यावेळेस त्याला त्याच्यासोबत काय चालले आहे,याची काहीच कल्पना नव्हती.
advertisement
बाबू छत्रीला घरातून नेल्यानंतर ध्रुव साहू त्याला नागपुरातील नारा वस्तीत घेऊन गेला होता. या वस्तीत घेऊन गेल्यानंतर सुरूवारातीला बाबू छत्रीला तारांनी बांधण्यात आलं होतं. त्यानंतर चाकूने त्याच्या शरीरावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले होते,त्यामुळे बाबू छत्री रक्ताच्या थारोळ्यात सापडला होता.या घटनेची माहिती स्थानिकांना मिळताच त्यांनी तत्काळ पोलिसांना याची माहिती दिली.त्यानंतर पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले होते.
घटनास्थळी पोहोचताच पोलिसांना तत्काळ बाबू छत्री याला मेयो रुग्णालयात दाखल केले होते. पण उपचाराआधीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले होते. दरम्यान या घटनेची छत्री कुटुंबियांना माहिती मिळताच त्यांना मोठा धक्का बसला होता. त्यानंतर बाबू छत्रीची बहीण शिल्पा छत्रीच्या तक्रारीवरून पोलिसांनी ध्रुव साहू विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
प्राथमिक तपासात बाबू छत्रीचा स्थानिक गुन्हेगारी घटकांशी वाद असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र हत्येचा नेमका हेतू अजून स्पष्ट झालेला नाही. पोलिसांनी या प्रकरणात आरोपी ध्रुव शाहू यास अटक केली आहे. सद्यस्थितीत एकच आरोपी निष्पण्ण झाला आहे.या प्रकरणाचा अधिकचा तपास सूरू आहे. या घटनेने नागपूरमध्ये खळबळ माजली आहे.