नागपुरात तरुणांवर गुन्हा दाखल
नागपुरात नेहमीप्रमाणे लोकांनी पाकिस्तान विजयाचा आनंद व्यक्त केला. नागपुरात देखील लोकांनी फटाके सांभाळून ठेवले होते. विराटने फटाके फोडण्याची संधी दिल्यानंतर नागपुरात लोकांनी दिवाळी साजरी केली. मात्र, काही तरुणांना फटाके फोडणं अंगलट आलंय. फटाके फोडल्याने पोलिसांनी काही तरुणांवर गुन्हा दाखल केलाय. आरोपींनी गर्दीत लोकांवर पेटते फटाके फेकल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.
advertisement
लोकांच्या अंगावर फटाके फोडले
सामना संपल्यावर रात्री अकरा वाजता लक्ष्मी भुवन चौकात हजारो लोकांची गर्दी होती. लोकांनी मोठा जल्लोष करत चौकात आनंद व्यक्त केला. भारत माता की जय म्हणत विजयाचा आनंद लुटला. तर काही तरुणांनी फटाके आणले अन् लोकांच्या अंगावर फटाके फेकण्यास सुरूवात केली. जल्लोषात आपण काय करतोय, याचं भान तरुणांना राहिलं नाही. पेटत्या फटाक्यांमुळे अपघात होण्याची शक्यता होती, प्रसंगी हा खेळ जिवावर उठण्याची शक्यता होती.
पाच तरुणांवर कारवाई
दरम्यान, गर्दीवर फटाके फेकल्या प्रकरणी नागपूर पोलिसांकडून पाच तरुणांवर कारवाई करण्यात आली आहे. तरुणांचा हा अल्लडपणा लक्षात घेऊन अंबाझरी पोलीस स्टेशनमध्ये पाच तरूणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.
टीम इंडियाचा दणदणीत विजय
दरम्यान, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाचा 6 विकेटने दणदणीत विजय झाला. पाकिस्तानने दिलेलं 242 रनचं आव्हान भारताने 42.3 ओव्हरमध्येच 4 विकेट गमावून पार केलं. विराटने नाबाद 100 तर श्रेयस अय्यरने 56 रनची खेळी केली. शुबमन गिलनेही 46 रन केले. या विजयासोबतच टीम इंडियाचं चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमी फायनलमधलं स्थान निश्चित झालं आहे.
