TRENDING:

...अन् थेट नरडं दाबायला केली सुरुवात, नागपुरात पेट्रोल पंप लुटीचा धक्कादायक VIDEO

Last Updated:

Crime in Nagpur: नागपुरात एका पेट्रोल पंपावर काही गावगुंडांनी कर्मचाऱ्यांना लुटण्याचा प्रयत्न केला आहे. घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नागपूर: नागपुरातील माटे चौक परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. पेट्रोल पंपावर आलेल्या काही गावगुंडांनी पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना लुटण्याचा प्रयत्न केला आहे. आरोपींनी पंपावरील कर्मचाऱ्यांना धमकी देत मारहाण केली. तसेच चाकुचा धाक दाखवत पेट्रोल पंप लुटण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, पंपावरील इतर कर्मचारी सावध झाले, त्यांनी मध्यस्थी केल्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पोबारा केला. पेट्रोल पंप लुटीचा हा सगळा धक्कादायक प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
News18
News18
advertisement

मिळालेल्या माहितीनुसार, हा धक्कादायक प्रकार गुरुवारी संध्याकाळी माटे चौकातील विशाल पेट्रोलियमवर घडला आहे. सायंकाळी साडेचारच्या सुमारास तीन ते चार दुचाकीवर बसून गावगुंडांची एक टोळी पेट्रोल पंपावर दाखल झाली होती. दारूच्या नशेत असणाऱ्या या गावगुंडानी पेट्रोल भरणाऱ्या इतर वाहन चालकांना धडक दिली. त्यानंतर पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांशी वाद घालत त्यांना मारहाण सुरू केली.

advertisement

यावेळी काही गुंडांनी चाकूचा धाक दाखवत पंप कर्मचाऱ्यांच्या हातातील पेट्रोल पंपाचे पैसे लुटण्याचाही प्रयत्न केला. मात्र इतर वाहन चालकांनी आरडाओरडा केल्यामुळे हे गाव गुंड धमक्या देत तिथून पळून गेले. ही संपूर्ण घटना पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी तक्रार नोंदवली असून गावगुंडांचा शोध घेतला जात आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
डायबिटीज रिव्हर्सल म्हणजे काय? शरीराला कसा होतो फायदा? Video
सर्व पहा

व्हायरल व्हिडीओमध्ये दारुच्या नशेत असलेले काही तरुण पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना मारहाण करताना दिसत आहेत. यातील एक आरोपीने थेट अंगावर धावत येत एका पेट्रोल कर्मचाऱ्याचा नरडं दाबण्याचा प्रयत्न केला आहे. तर इतर आरोपींनी कर्मचाऱ्याला मारहाण केली आहे. या घटनेचा व्हिडीओ पोलिसांना देण्यात आला असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/नागपूर/
...अन् थेट नरडं दाबायला केली सुरुवात, नागपुरात पेट्रोल पंप लुटीचा धक्कादायक VIDEO
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल