अरुण गवळी याला नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्या हत्याप्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सध्या तो नागपूरच्या कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत. 2006 च्या शासन निर्णयाच्या आधारे गवळीने शिक्षेतून सूट मिळावी अशी मागणी केली होती. 2006 च्या शासन निर्णयानुसार वयाची 65 वर्षे पूर्ण झालेल्या अशक्त, निम्मी शिक्षा भोगलेल्या कैद्याला शिक्षेत सूट मिळते. याच आधारावर अरुण गवळी यानं आपल्याला शिक्षेतून सूट मिळावी अशी मागणी केली होती.
advertisement
अरुण गवळीच्या याचीकेवर नागपूर खंडपीठात सुनावणी पुर्ण झाली होती, मात्र कोर्टाने निकाल राखून ठेवला होता. मात्र आता 2006 च्या निर्णयानुसार त्यांची तुरुंगातून शिक्षेच्या मुदतीपूर्वीच सुटका होणार आहे. तुरुंगातून सुटका होणार असल्यानं गवळीला मोठा दिलासा मिळाला आहे.
Location :
Nagpur,Nagpur,Maharashtra
First Published :
April 05, 2024 12:33 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नागपूर/
Arun Gawli : मोठी बातमी! डॉन अरुण गवळी येणार तुरुंगातून बाहेर; ..म्हणून शिक्षेच्या मुदतीपूर्वीच होणार सुटका