TRENDING:

Maharashtra Elections 2024 : भाजपकडून विदर्भासाठी 'आस्ते कदम'! फक्त 19 उमेदवारांची घोषणा, उर्वरित जागांचे काय?

Last Updated:

Maharashtra Assembly Elections 2024 BJP : भाजपने आपल्या पहिल्या यादीत विदर्भातील अवघ्या 19 जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत. विदर्भात विधानसभेच्या 62 जागा आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नागपूर :   भारतीय जनता पक्षाने विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत बहुतांशी जुन्या चेहऱ्यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. तर, दुसरीकडे सत्ता समीकरणात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या विदर्भासाठी भाजपने आस्ते कदमची भूमिका घेतलीय का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. भाजपने आपल्या पहिल्या यादीत विदर्भातील अवघ्या 19 जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत. विदर्भात विधानसभेच्या 62 जागा आहेत.
BJP Maharashtra Elections 2024
BJP Maharashtra Elections 2024
advertisement

भाजपने विदर्भासाठी कंबर कसली आहे. विदर्भात यापूर्वी भाजपला चांगले यश मिळाले होते. या भागातील अनेक जागांवर काँग्रेससोबत थेट लढत असणार आहे. लोकसभा निवडणुकीत बसलेल्या धक्क्यानंतर भाजपने आता आपले लक्ष विदर्भाकडे केंद्रीत केले आहे. त्याच्या परिणामी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्या सभा विदर्भात आयोजित करण्यात आलेल्या. विदर्भात यश मिळवण्यासाठी संघाचीदेखील मदत घेतली जात आहे.

advertisement

महायुतीच्या जागांचे वाटप न झाल्याने अजूनही तिढा कायम असल्याचे म्हटले जात आहे. विदर्भात शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार गटाला काही जागा सोडण्यात येणार आहेत. त्यानंतर भाजप आणि महायुतीकडून उर्वरित जागांवरील उमेदवार जाहीर केले जाणार असल्याची माहिती आहे.

चंद्रपूरमधील 6 जागांपैकी एकच उमेदवार जाहीर....

भाजपने गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा मतदारसंघातून विजय रहांगडाले, गोंदियातून विनोद अग्रवाल, आमगावमधून संजय पुराम यांची नावे पंषित करण्यात आली आहेत. चंद्रपूर जिल्हयातील 6 जागांपैकी बल्लारपूरमधून सुधीर मुनगंटीवर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.

advertisement

वर्धा जिल्ह्यातील 4 जागांपैकी केवळ एक जागा भाजपने जाहीर केली आहे. यामध्ये हिंगणघाट मतदारसंघातून समीर कुणावार यांना तिसऱ्यांदा संधी देण्यात आली आहे. तर भंडारा जिल्ह्यातील तीनपैकी एकाही जागेची घोषणा झालेली नाही.

अमरावतीमध्ये 4 पैकी 2 जागांची घोषणा...

अमरावती जिल्ह्यातील 4 पैकी 2 जागांची घोषणा करण्यात आली आहे. धामणगाव रेल्वेमधून प्रताप अडसड, अचलपूरमधून प्रवीण तायडे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. तर, अकोला जिल्ह्यातील 5 पैकी एका जागेवर उमेदवार जाहीर करण्यात आला आहे. अकोला पूर्व मधून रणधीर सावरकर हे निवडणुकीच्या रिंगणात असतील.

advertisement

बुलढाण्यात दोन जागांची घोषणा...

बुलढाण्यातील 7 पैकी 2 जागांवर उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. चिखलीतून श्वेता महाले आणि खामगावमधून आकाश फुंडकर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.

वाशिममध्ये एकही उमेदवार जाहीर नाही....

वाशिम जिल्ह्यातील तीन पैकी एकाही जागेवर उमेदवार जाहीर करण्यात आला नाही. यवतमाळ जिल्ह्यात विधानसभेच्या 7 जागा आहेत. वणी येथून संजीवरेड्डी बोदकुरवार, राळेगावमधून अशोक उईके निवडणुकीच्या मैदानात असणार आहेत. यवतमाळमधून मदन येरावार हे तिसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत.

advertisement

इतर संबंधित बातमी :

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतकऱ्यानं डोकं लावलं, डाळिंबीच्या बागेत पैशाचं पीक, अर्ध्या एकरात 2 लाखांचं...
सर्व पहा

तुमच्या जिल्ह्यात कुणाला उमेदवारी? भाजपची जिल्हानिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी

मराठी बातम्या/महाराष्ट्र/नागपूर/
Maharashtra Elections 2024 : भाजपकडून विदर्भासाठी 'आस्ते कदम'! फक्त 19 उमेदवारांची घोषणा, उर्वरित जागांचे काय?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल