एक वादळ भारताचे चळवळ
नागपुरातील तरुण सोशल मीडियाच्या माध्यमातून एकत्र येत एक वादळ भारताचे ही चळवळ गेल्या आठ वर्षापासून राबवित आहेत. या चळवळीच्या माध्यमातून दिल्लीच्या धर्तीवर नागपुरातील फुटाळा तलाव येथे मिशन राजपथ ही संकल्पना राबविण्यात येत आहे. या मोहिमे अंतर्गत 6 राज्यातील 90 पेक्षा जास्त शहर आणि 450 हून अधिक ठिकाणी एक साथ राष्ट्रगीत गात राष्ट्रीय सण साजरा केला जाणार आहे. सर्व सामाजिक आणि धार्मिक ठिकाणी एकसाथ राष्ट्रगीत आणि झेंडावंदन साजरं व्हावं यासाठी लोकांमध्ये जनजागृती करणं हा चळवळीचा मुख्य हेतू आहे.
advertisement
महाराष्ट्रातील 'आष्टी शहीद' गाव माहितीये का? स्वातंत्र्यासाठी उचललं होतं मोठं पाऊल
नागपुरात मिशन राजपथ
एक वादळ भारताचं या चळवळीच्या माध्यमातून फुटाळा तलाव नागपूर येथे 'मिशन राजपथ' संकल्पना साकारण्यात येणार आहे. दरवर्षी 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला राजपथावरील प्रतिकृती फुटाळ तलाव येथे सादर करण्यात येते. यावर्षीसुद्धा स्वातंत्र्य दिनी 'मिशन राजपथ'चे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी 'एक झाड देशासाठी... 52 सेकंद राष्ट्रगीतासाठी...!' माध्यमातून जागतिक तापमानवाढ विरोधात लढून प्रजासत्ताक दिन साजरा करण्याचा संदेश देण्यात येत आहे.
कसा असणार कार्यक्रम?
नागपुरात हा कार्यक्रम सकाळी 8 वाजता सुरु होऊन, त्यात विविध ढोलताशे, NCC परेड तसेच स्काऊट गाईड परेड, 75 राष्ट्रीय ध्वजांचे एकसाथ ध्वजारोहण होणार आहे. त्यानंतर पथसंचलन करण्यात येईल. 9 वाजता लहान मुलांचे स्केटिंग वरील थरार तसेच नागपूरमधील आखाड्याच्या माध्यमातून येथे प्रात्यक्षिक होतील. त्यानंतर 10 वाजून 30 मिनिटांनी एकसाथ राष्ट्रगीत गायन होणार आहे. शेवटी पथनाट्याच्या माध्यमातून सामाजिक संदेश देऊन कार्यक्रमाची सांगता होईल, असे संकल्पक वैभव शिंदे यांनी सांगितले.
SPECIAL STORY : अशीही देशसेवा, 50 वर्षांपासून तिरंगा बनवतंय पुण्यातील हे शेख कुटुंब!
कार्यक्रमाचे आगळेवेगळे स्वरुप
या कार्यक्रमाला कोणीही अतिथी नाही, स्टेज नाही, खुर्च्या नाही. येथे सर्व फक्त भारतीय म्हणून एकत्र येण्याचे आवाहन या अभियानाचे मुख्य समन्वयक वैभव शिंदे यांनी केले आहे. अशाप्रकारचे आयोजन संपूर्ण जिल्ह्यात हिंगणा, कामठी, उमरेड, नागपूर ग्रामीण, सावनेर सहित 50 पेक्षा जास्त ठिकाणी करण्यात आले आहे. नागपूर विदर्भासह, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, छत्तीसगढ, गुजरात, तेलंगणा व आंध्रप्रदेश, कर्नाटक राज्यातील 450 पेक्षा जास्त ठिकाणांवर हा कार्यक्रम पार पडणार आहे. तरी जास्तीत जास्त लोकांनी या मोहिमेत सहभागी होऊन हा राष्ट्रीय सण साजरा करावा, असे आवाहन या चळवळीच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.