मुंबईतील लालबागचा राजा, पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती इत्यादींच्या धर्तीवर नागपुरातील नागपूरचा राजा नावारुपास आला आहे. नागपूरचा राजा गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष असलेले दीपक जयस्वाल हे मुंबईवरून नागपुरात आले असता त्यांनी मुंबई, पुण्याच्या प्रतिष्ठित मनाच्या गणपतीच्या धर्तीवर नागपुरात देखील त्याच छाटणीचा गणेशोत्सव साजरा व्हावा अशी संकल्पना आमच्यापुढे मांडली आणि 1995 साली या गणेश मंडळाची स्थापना झाली.
advertisement
गणेशोत्सवात घ्या नागपूरमधील 'या' 10 गणपतीचे दर्शन; भव्य देखावे फेडतील डोळ्यांचं पारणं
यंदाचे हे 27वें वर्ष आहे. दरवर्षी गणेश मूर्तीची उंची एक एक इंचांनी वाढत असते. नागपुरातील अतिशय श्रीमंत आणि मानाच्या गणपतीतील अग्रगण्य असा या मंडळाचे लौकिक आहे. दरवर्षी गणेश मूर्तीवर एक सोन्याचा दागिना चढत असतो. आज घडीला गणेश मूर्तीवर सोन्याचा पंजा, सोन्याचे पाय गळ्यात सोन्याचा हार चांदीचे मुकुट माणिक मोते असे विविध आभूषणांनी गणेश मूर्ती सजली आहे.अशी माहिती मंडळाचे पदाधिकारी भाऊ पत्की यांनी दिली.
नागपूरकरांना अनुभवता येणार स्वराज्याची राजधानी, देखाव्यातून मांडला शिवरायांचा इतिहास
नागपूरच्या राजाच्या दर्शनासाठी दरवर्षी विदर्भासह जवळच्या राज्यातले गणेशभक्त येत असतात. या बाप्पाच्या दर्शनानं इच्छित मनोकामना पूर्ण होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे. दहा दिवसांमध्ये पन्नास हजारांपेक्षा जास्त भाविक दर्शनासाठी येतील असा अंदाज आहे. यंदा 1000 मोदकांचा गणेश याग दहा दिवस चालणार आहे, अशी माहिती पत्की यांनी दिली.





