पोलीस कर्मचाऱ्याने गोळी झाडल्यानंतर तातडीनं त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं.सध्या त्याची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नागपूरचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या बंगल्यावर गार्ड ड्युटीवर तैनात हा पोलीस कर्मचारी तैनात होता. पोलीस कर्मचारी विशाल तुमसरे असं त्यांचं नाव आहे.
विशाल यांनी आज सकाळी स्वतःच्याच बंदुकीतून स्वतःवर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला. स्वतः पोलीस अधीक्षकांनी विशाल तुमसरेला एम्स रुग्णालयात नेऊन दाखल केले असून सध्या जखमी पोलीस कर्मचाऱ्यावर उपचार सुरू असून त्यांची स्थिती गंभीर आहे. धक्कादायक बाब म्हणजे शेअर मार्केट मधील गुंतवणुकीत मोठा नुकसान झाल्यामुळे विशाल तुमसरे यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची खात्रीलायक माहिती आहे.
advertisement
शेअर मार्केटमध्ये आपली जमापुंजी लावून पैसे दुप्पट करण्याचा धोका टाळावा, वारंवार शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करुन लाखो रुपये कमवा अशा जाहिराती येत असतात. मात्र तिथे गुंतवणूक करणं जोखमीचं असतं. हे माहिती असूनही त्यांनी पैसे गुंतवले. त्यांना मोठं नुकसान झाल्याने त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं. तुम्ही अशा कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्य़ाआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. नाहीतर मोठं नुकसान होऊ शकतं. शिवाय फक्त शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक हा एकच पर्याय कधीच ठेवू नये, आपला पोर्टफोलियो डाव्हर्सिफाय असावा असंही काही तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
