नागपूर: 20 वर्षांपूर्वी नागपुरातील संजय कुमार गुप्ता यांचा रस्त्यावर अपघात झाला. भीषण अपघातामुळे संजय यांना गंभीर दुखापत झाली. त्यातून सावरत आता ते नागपुरातील रस्त्यांवर हेल्मेट संदर्भात जनजागृती करत आहेत. वाहतूक नियमांचे पालन करून सुरक्षित प्रवास नागरिकांनी करावा यासाठी ते गेल्या 18 वर्षांपासून जनजागृती करत आहेत.
अशी घडली होती घटना
advertisement
संजय कुमार गुप्ता हे पेशाने मेडिकल रिप्रेझेंटिव्ह आहेत. 18 फेब्रुवारी 2004 रोजी संध्याकाळी ते आपले नियमित काम आटपून घरी जात होते. तेव्हा अनावधानाने गाडीचे साईड स्टॅन्ड काढायला ते विसरले आणि त्यामुळे अपघात झाला. त्यांच्या डोक्याला व पायाला जबर मार लागला. आपल्यावर जो प्रसंग ओढावला तो इतर कुणावरही ओढवू नये म्हणून संजय कुमार यांनी जनजागृतीचा निश्चय केला. गेली 18 वर्षांपासून नागपुरातील रस्त्यांवर दैनंदिन जीवनातल्या फावल्या वेळेत ते विविध संदेश असलेले बॅनर घेऊन लोकांमध्ये जनजागृती करत आहेत.
रस्त्यावरील ही चिन्हे नियम सांगतात? पण काय असतो त्यांचा नेमका अर्थ?
काय सांगतात गुप्ता?
ट्रॅफिक नियम पाळा, हेल्मेटचा वापर करा, मोबाईलचा वापर गाडी चालवताना टाळा, अशा आशयाच्या बॅनर घेऊन गुप्ता हे रस्त्यावर उभा राहतात. बॅनरच्या माध्यमातून लोकांना जीवनाचे मोल समजावून सांगतात. राज्यातील अनेक शहरांत काही लोक मला वेडे समजतात तर काही लोक माझ्या कामाचा गौरव करतात. मात्र गेल्या 18 वर्षांपासून मी हे कार्य अविरतपणे करत आलेलो आहे. पुढे देखील करत राहणार आहे, असे गुप्ता सांगतात.
असा ट्रॅफिक पोलीस पाहिला नसेल, डान्स करुन वाहतूक नियंत्रण, यामागे काय आहे कारण?
विविध शहरांत जनजागृती
जीवन हे अमूल्य आहे आणि जीवनाचा पार्ट टू हा कधीही नसतो. गेल्या अनेक वर्षांपासून मी शाळा महाविद्यालयात जाऊन या विषयी लेक्चर देत असतो. नागपूर सह पुणे, मुंबई, अमरावती, भंडारा, अहमदनगर इत्यादींसारख्या शहरांमध्ये जाऊन देखील माझे हे कार्य सुरू असते. महाविद्यालयातील मुलांना नियमांची माहिती देतो. माझ्या कार्याची दखल दिलीप वळसे पाटील यांनी देखील घेतली आहे. त्यांनी दोन वर्ष मला नियमित बोलवून शहरातल्या अनेक महाविद्यालयांत लेक्चर देण्यास सांगितले होते, असेही गुप्ता यांनी सांगितले.
दरम्यान, वाहन चालवताना योग्य ती खबरदारी नागरिकांनी घेतली पाहिजे. वाहतूक नियमांचा काटेकोर पालन केले पाहिजे. हेल्मेटचा वापर करायलाच हवा. असे छोट्या छोट्या गोष्टीतून देखील आपले प्राण वाचू शकेल. यासाठी मी लोकांमध्ये उभा राहून हे जनजागृती कार्य करत आहे, अशी माहिती संजय कुमार गुप्ता यांनी दिली.





