नागपूर : राज्यातील वातावरणात पुन्हा मोठा बदल घडून आला आहे. थंडीचा कडाका वाढत असताना राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. गेले काही दिवस विदर्भात थंडीचा कडाका कायम आहे. 10 जानेवारीला विदर्भात कुठलीही पावसाची शक्यता नाही. मात्र, काही जिल्ह्यातील पारा आणखी घसरलाय. त्यामुळे विदर्भात थंडीचा कडाका वाढणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे.
advertisement
10 जानेवारीला विदर्भात काही जिल्ह्यांत धुके आणि ढगाळ आकाश तर काही जिल्ह्यांत ढगाळ आकाश असणार आहे.
10 जानेवारी रोज शुक्रवारला नागपूर, अकोला, गोंदिया या तीन जिल्ह्यातील किमान तापमान 10 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. नागपूर आणि गोंदियातील किमान तापमान स्थिर आहे तर अकोल्यातील किमान तापमानात घट झालेली दिसून येत आहे. नागपूरमध्ये अंशतः ढगाळ आकाश असणार आहे.
कंपनीचा CEO काहीच नाही! शेतकऱ्याने शेतीतून कमावले 8 कोटी रुपये, प्रत्येकांनी पाहावी अशी रिअल स्टोरी
अमरावती, वर्धा, भंडारा या तीन जिल्ह्यातील किमान तापमान 11 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. अमरावतीमध्ये 10 जानेवारीला धुक्यासह ढगाळ आकाश असणार आहे. अमरावतीमधील किमान तापमानात 1 अंशांनी वाढ झालेली दिसून येत आहे. किमान तापमानात घट आणि वाढ होत असली तरीही विदर्भात पहाटेच्या वेळी सारखाच गारवा जाणवत आहे.
बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यातील किमान तापमान 13 अंश सेल्सिअस इतके असून या सर्व ठिकाणी ढगाळ आकाश असणार आहे. विदर्भातील सर्वच जिल्ह्यातील किमान तापमान पुढील 2 दिवस स्थिर राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. त्यानंतर विदर्भातून थंडी गायब होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील किमान तापमान 12 अंश सेल्सिअस ते वाशिम जिल्ह्यातील किमान तापमान 14 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. विदर्भात सर्वत्र धुके आणि ढगाळ आकाश बघायला मिळणार आहे. पहाटे आणि सायंकाळच्या वेळी गारवा जाणवत असल्याने आरोग्याच्या समस्या उद्भवत आहेत. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे.