नरेश म्हस्के माध्यमांशी बोलताना म्हणाले, गणेश नाईक ज्येष्ठ नेते आहेत आपली ताकत असेल तर डिक्लेअर करा म्हणून तुम्ही बोलत आहात. पण तुम्ही म्हणजे भाजप नाही आणि लायक कोण नालायक कोण हे वेळोवेळी नवी मुंबई मधील जनतेने दाखवले आहे, अशा शब्दात त्यांनी गणेश नाईकांच्या टीकेचा समाचार घेतला आहे.
तुमच्या जेष्ठत्वाचा मान आम्ही ठेवतो म्हणून आमच्या तोंडून अपशब्द येणार नाहीत.परंतु आपण सुद्धा बोलताना भान ठेवा.जरी आम्ही बोललो नाही तरी सर्वसाधारण खालचा कार्यकर्ता तुमच्या विरोधात बोलला तशा पद्धतीने शब्द वापरले तर या वयात तुम्हाला ते आवडणार नाहीत.तुम्हाला ते पटणार नाहीत खूप यातना होतील..बोलताना बोलताना तारतम्य बाळगा आपण ज्येष्ठ आहात जेष्ठत्वाचा मान आम्ही कायम ठेवतो,असा इशारा देखील नरेश म्हस्के यांनी गणेश नाईकांना दिला.
advertisement
एकनाथ शिंदेवरील टीका खपवून घेणार नाही
शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांनी देखील यावर सतंप्त प्रतिक्रिया दिली आहे.नालायकांच्या हाती सत्ता देऊ नये,म्हणजेच त्याच्या हाती सत्ता दिली जाणार नाही मुख्यमंत्र्याना हे पटतं का ? असा सवाल उदय सामंत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केला आहे.समन्वय समिती ही संवाद साधण्यासाठी आहे. उठ सूट एकनाथ शिंदेवर टिका खपवून घेणार नाही. नाईकांना काही अडचणी असतील तर त्यांनी एकनाथ शिंदे यांचा वेळ घ्यावा,असा सल्ला सामंत यांनी गणेश नाईक यांना दिला आहे.तसेच आमच्या खासदारांनाही बोलता येत नाही का?पण साहेब सांगतात की मित्र पक्षावर बोलू नका म्हणून सर्व शांत आहेत,असे देखील त्यांनी सांगितले.
गणेश नाईकांच विधान काय?
तुम्ही भविष्याचा विचार करणार की नाही.नवीन एफएसआय लागू झाला तर या शहराची वाट लागेल. आज नवी मुंबईत काही ठिकाणीच पाणी साचतं.तुंबापूरी होतं नाही.कारण आपण या शहराच्या नाल्याची रचना तशी केली आहे. पण जर नालायक लोकांच्या हातात महानगरपालिकेची सत्ता गेली तर शहराचं वाटोळ होईल, आपण जबाबदारी हे विधान करत असल्याचे देखील नाईक यांनी स्पष्ट केलं.आपल्या मनात कुणाविषयी द्वेश नाही,असे म्हणत त्यांनी एकनाथ शिंदे यांचं नाव न घेता टीका केली होती.