TRENDING:

उद्या भाजपप्रवेश, एक दिवस आधीच अपूर्व हिरेंच्या अडचणीत वाढ, पोलिसांत तक्रार दाखल

Last Updated:

Apporva Hire: फसवणूक झालेल्या कर्मचाऱ्याच्या तक्रारीवरून मालेगाव कॅम्प पोलीस स्थानकात अपूर्व हिरेसह इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
बब्बू शेख, मालेगाव : मंत्री दादा भुसे आणि डॉ. अपूर्व हिरे यांच्यातील राजकीय कुरघोडीचे राजकारण संपण्याची चिन्हे नाहीत. या राजकारणाला कंटाळून अपूर्व हिरे गुरुवारी भाजप प्रवेश करणार आहेत. भाजपात प्रवेश करण्याच्या तयारीत असलेल्या अपूर्व हिरे यांच्या अडचणीत वाढ झाली असून त्यांनी श्री व्यंकटेश को ऑपरेटिव्ह बँकेचे चेअरमन असताना महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेत कार्यरत असलेल्या अनेक कर्मचाऱ्यांच्या नावे लाखो रुपयांचे परस्पर कर्ज काढल्याचा आरोप करण्यात आला.
अपूर्व हिरे भाजप प्रवेश करणार
अपूर्व हिरे भाजप प्रवेश करणार
advertisement

फसवणूक झालेल्या कर्मचाऱ्याच्या तक्रारीवरून मालेगाव कॅम्प पोलीस स्थानकात अपूर्व हिरेसह इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्वतःच्या संस्थेतील शिक्षकांची दिशाभूल करून शिक्षकांच्या नावे काढलेल्या कर्ज रकमेची स्वतः च्या खात्यावर वर्ग करून लाखो रुपयाचा अपहार केल्याचा आरोप शिक्षकांनी केला आहे.

संबंधित कर्ज विविध कर्मचाऱ्यांच्या नावाने घेण्यात आल्याचे दाखविण्यात आले आहे. प्रत्यक्षात मात्र हे कर्ज हिरे कुटुंबीयांनी स्वतःसाठी घेतले असल्याचा दावा शिक्षक पवार यांनी केला आहे. त्यामध्ये कर्मचाऱ्यांच्या नावे कर्ज घेऊन त्यांची फसवणूक केल्याचा गंभीर प्रकार उघड झाल्याचा दावा आहे.

advertisement

दरम्यान, अपूर्व हिरे यांनी सर्व आरोप फेटाळले असून मी उद्या सकाळी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणार आहे. त्यामुळे माझ्याविरोधात विरोधकांचे कारस्थान आहे. माझ्या भाजप प्रवेशाच्या भीतीपोटी हे कट कारस्थान रचले गेले आहे. विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे, असे सांगत या तक्रारीत कुठलेही तथ्य नसल्याचे अपूर्व हिरे यांचे म्हणणे आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीनच्या दरात आज वाढ की घट? कोणत्या मार्केटमध्ये किती मिळाला भाव? Video
सर्व पहा

कर्मचाऱ्यांनी केलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या माहितीशिवाय त्यांच्या नावावर कर्ज काढण्यात आले आणि ती रक्कम वैयक्तिक खात्यांमध्ये वळवण्यात आली. या मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी जोर धरत आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
उद्या भाजपप्रवेश, एक दिवस आधीच अपूर्व हिरेंच्या अडचणीत वाढ, पोलिसांत तक्रार दाखल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल