नाशिकच्या गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत जन्मदात्या पित्यानेच आपल्या पोटच्या पोरीवरच लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. ही घटना तेव्हा उघडकीस आली जेव्हा एका परप्रांतीय कुटुंबातील 17 वर्षीय मुलीला महिनाभरापूर्वी डोकेदुखीचा त्रास होत होता. त्यामुळे तिच्या आई वडिलांनी तिला सातपूरच्या कामगार विमा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. या दरम्यान मुलीने पोटदुखी व पोट स्वच्छ होत नसल्याची तक्रार केली होती.त्यानुसार डॉक्टरांनी मुलीची सोनोग्राफी केली होती. या सोनोग्राफी टेस्टमधून जे समोरं आलं त्याने डॉक्टरांसह आईच्या पायाखालची जमीन देखील सरकली होती.कारण मुलगी सात आठवड्याची गर्भवती असल्याचे निदान झाले होते.
advertisement
या घटनेनंतर मुलीला तत्काळ जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले होते.तसेच डॉक्टरांनी या घटनेची माहिती पोलिसांना देखील दिली होती. यावेळी पोलिसांना पीडित मुलगी व तिच्या आईसोबत संवाद साधण्याचा प्रयत्न केला.पण या मायलेकींसह तिच्या वडिलांनी माहिती देण्यास टाळाटाळ केला होता.
त्यामुळे पोलिसांना वडिलांवरच संशय बळावला होता.त्यामुळे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जग्वेंद्रसिंग राजपूत यांनी गुन्हे शोध पथकाचे उपनिरीक्षक मोतीलाल पाटील, सहायक निरीक्षक पूनम पाटील, परिविक्षाधिन उपनिरीक्षक प्रियंका कवाद यांची दोन पथके तयार केली.या पथकांनी पीडित मुलगी व गर्भाचे डीएनए नमुने संकलित करत तपासणीला पाठवविले होते.या तपासणीत बापाच्या डीएनए नमुन्यांची तपासणी केली असता नराधम वडिलाचं पितळं उघडं पडलं होतं.
दरम्यान आपल्याच लेकीच लैंगिक शोषण करणाऱ्या नराधम बापाला पोलिसांनी अटक केली आहे. तसेच त्याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सूरू आहे. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे.