रोकडोबावाडीच्या मशिदीनजीक अजय तायडे राहायला आहेत. त्यांचे १० महिन्यांचे बाळ होते. त्यांची गृहिणी पत्नी घरातच स्वयंपाक करत असताना झालेल्या दुर्लक्षामुळे त्यांचे बाळ बादलीत पडले.
रोशनला सांभाळता सांभाळता स्वयंपाक करू, असे म्हणून त्याची आई स्वयंपाक घरात गेली. रोशन खेळता खेळता बादलीजवळ गेला आणि त्याच बादलीत पडला. बाळ खेळत असल्याचे समजून आई स्वयंपाक पूर्ण करण्याच्या घाईत होती. काही वेळाने रोशन कुठे आहे, हे पाहण्यासाठी आई जेव्हा स्वयंपाकघरातून बाहेर आली, त्यावेळी त्यांना रोशन दिसेनासा झाला.
advertisement
शेवटी त्यांनी पाण्याच्या बादलीत पाहिले, तेव्हा नाकातोंडात पाणी गेलेला रोशन त्यांना दिसून आला. त्यांनी रोशनला तत्काळ बिटको रुग्णालयात नेले. मात्र तेथील डॉ. उगले यांनी रोशनला मृत्यू घोषित केले. या घटनेचा तपास पोलीस करत आहेत.
आई वडिलांचा आक्रोश
रोशनचा बादलीत बुडून मृत्यू झाल्याने संपूर्ण गाव हळहळ व्यक्त करत आहेत. १० महिन्यांचे बाळ गेल्याने रोशनच्या आई वडिलांनी एकच आक्रोश केला. त्यांचा आक्रोश पाहून उपस्थितांना रडू कोसळले.