काय घडलं नेमकं?
मिळालेल्या माहितीनुसार, भाग्यश्रीने प्रेमविवाह केला होता. लग्नानंतर अवघ्या महिन्याभरातच तिच्यावर सासूकडून छळाला सुरुवात झाली. "घरातील काम नीट करत नाहीस, जास्त बोलत नाहीस, सतत मोबाईल बघतेस," अशा तुच्छ बोलण्याने तिला मानसिक त्रास दिला जात होता. महत्त्वाचे म्हणजे, ज्याच्यावर जीवापाड प्रेम करून भाग्यश्रीने लग्न केले होते, तो तिचा नवरा या सर्व प्रकाराकडे दुर्लक्ष करत होता. पतीकडून साथ न मिळाल्याने भाग्यश्री पूर्णपणे एकाकी पडली होती. या नैराश्यातूनच तिने टोकाचे पाऊल उचलले.
advertisement
आईचा हृदयद्रावक अनुभव
आत्महत्या केलेल्या भाग्यश्रीच्या आईने दिलेल्या माहितीनुसार, "२७ मे रोजी भाग्यश्रीने मला फोन केला होता. 'सासू आणि नवरा सारखं बोलतात. नवरा माझी बाजू घेत नाही. मी एकाकी पडले आहे,' असे सांगून तिनं फोन ठेवला. त्याच रात्री नऊ वाजता तिने विषारी औषध पिऊन आत्महत्या केली." भाग्यश्रीच्या सासरच्यांनी तिला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले, परंतु उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
सासू आणि नवऱ्याविरोधात गुन्हा दाखल
या प्रकरणी भाग्यश्रीच्या आईने आडगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी भाग्यश्रीच्या नवऱ्यासह सासूविरोधात आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी तातडीने नवऱ्यासह सासूला अटक केली आहे. पुण्यातून सुरू झालेल्या हुंडाबळीच्या घटनांची मालिका आता नाशिकपर्यंत पोहोचली आहे. भाग्यश्रीच्या आत्महत्येने पुन्हा एकदा समाजात मुलींवर होणाऱ्या अन्यायाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास करून दोषींना कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.