धारदार शस्त्रांनी सपासप वार
कृष्णा ठाकरे याच्यावर गोरेवाडी भागात तीन हल्लेखोरांनी कुरापत काढून धारदार शस्त्रांनी सपासप वार केले. या हल्ल्यात तो गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. त्याला तातडीने जवळच्या बिटको हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, परंतु नंतर त्याची प्रकृती पाहून त्याला शासकीय जिल्हा हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून कृष्णा यास मृत घोषित केलं.
advertisement
हल्ला जुन्या वादातून झाला?
प्राथमिक माहितीनुसार, हा हल्ला जुन्या वादातून झाला असण्याची शक्यता आहे. मारेकरी घटनेनंतर फरार झाले असून, पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत. याप्रकरणी मध्यरात्री उशिरापर्यंत नाशिक रोड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. दांडिया खेळताना झालेल्या वादातून खून झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
9 महिन्यांत खुनाचा आकडा 43 वर
नाशिक शहरात गेल्या 9 महिन्यांत खुनाच्या घटनांचा आकडा भयावह आहे. या घटनेमुळे शहरातील खुनाच्या घटनांचा आकडा 43 वर पोहोचला आहे. ऑक्टोबर महिन्याची सुरुवात देखील खुनाच्या घटनेने झाली असताना, दुसऱ्याच दिवशी पुन्हा एका युवकाचा खून झाल्याने शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न अधिक गंभीर बनला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.