चेन्नई आणि वाढवण बंदरांची कनेक्टिव्हिटी
या एक्स्प्रेस वेची सर्वात मोठी खासियत म्हणजे, नाशिकहून पुढे तो पालघर जिल्ह्यातील महत्त्वाच्या वाढवण बंदराला जोडला जाईल. यामुळे दक्षिणेकडील चेन्नई आणि महाराष्ट्रातील वाढवण ही दोन मोठी बंदरे एका प्रस्तावित एक्स्प्रेस वेच्या माध्यमातून थेट एकमेकांशी जोडली जाणार आहेत.
advertisement
नाशिक ते अक्कलकोट: प्रवास केवळ 4 तासांत
प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात नाशिक ते अक्कलकोट या 374 किलोमीटर लांबीच्या 6-लेन एक्स्प्रेस वेचे बांधकाम करण्यात येणार आहे. सध्या रस्त्याने हे अंतर 524 किलोमीटर असून, प्रवासासाठी सुमारे 9 तास लागतात. मात्र, या नवीन मार्गामुळे हे अंतर 150 किलोमीटरने कमी होऊन केवळ 374 किलोमीटर होईल, तर प्रवासाचा वेळ 9 तासांवरून केवळ 4 तासांवर येणार आहे.
हा महामार्ग बांधा, वापरा, हस्तांतरित करा (BOT) या तत्त्वावर विकसित केला जाईल.
नाशिक-तिरुपती अंतर निम्म्यावर
हा संपूर्ण एक्स्प्रेस वे पूर्ण झाल्यानंतर महाराष्ट्रातील नाशिक आणि आंध्र प्रदेशातील तिरुपती ही दोन महत्त्वाची तीर्थक्षेत्रेदेखील जवळ येणार आहेत. सध्या रस्त्याने नाशिक ते तिरुपती हे अंतर कापायला 22 ते 23 तास लागतात, पण प्रस्तावित एक्स्प्रेस वेमुळे हा वेळ निम्म्यावर येऊन 11 ते 12 तासांवर येईल.
असा असेल नाशिकमधील 'कनेक्टिंग बिंदू'
नाशिकमध्ये हा महामार्ग मुंबई-आग्रा महामार्गावरील आडगावच्या ट्रक टर्मिनसजवळ कनेक्ट होईल.
गोंदे दुमाला येथे हा महामार्ग 'तवा (वाढवण) नाशिक एक्स्प्रेस वे'ला जोडून वाढवण बंदरापर्यंत कनेक्ट होईल.
सिन्नर तालुक्यातील वावी येथे तो 'समृद्धी महामार्गा'ला जोडला जाईल.
नाशिक जिल्ह्यातील सहा तालुके आणि 70 गावांमधून हा महामार्ग जाणार असून, त्यासाठी 195 हेक्टर भूसंपादन केले जाईल.
हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू या पाच राज्यांना जोडणार आहे. मार्गावरील प्रमुख शहरांमध्ये नाशिक, अहिल्यानगर, सोलापूर, अक्कलकोट, कलबुर्गी, कर्नूल, कडप्पा, तिरुपती आणि चेन्नई यांचा समावेश असेल.






