'बॉण्डपेपर'वरील दत्तक प्रक्रिया ठरली बेकायदेशीर
आदिवासीबहुल पाड्यावर राहणाऱ्या एका महिलेने मूल विकल्याच्या कथित प्रकाराने राज्यभर खळबळ माजली होती. घटनेनंतर नेमलेल्या विविध समित्यांच्या प्राथमिक अहवालात, 'बॉण्डपेपर'वर मुलाला दत्तक देण्याचा हा प्रकार स्पष्टपणे बेकायदेशीर असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
नणंदेनं दार उघडलं, वहिनीला भयावह स्थितीत बघताच चिरकली, नाशिकच्या पंचवटीत खळबळ
या गंभीर निष्कर्षांनंतर, परिसरातील अशा 'गुपचूप' झालेल्या देवाण-घेवाणीची संख्या तपासण्याचे निर्देश पोलीस यंत्रणेसह दुसऱ्या चौकशी समितीला देण्यात आले आहेत. त्यानुसार, आता तपास पथके खेडोपाडी जाऊन अवैधपणे दत्तक गेलेल्या मुलांचे रेकॉर्ड आणि तपशील गोळा करण्याच्या कामाला लागली आहेत.
advertisement
जन्मदाखले, आधारकार्ड कसे झाले तयार?
तपास यंत्रणा आता केवळ सद्य घटनेतील व्यक्तींच्या भूमिकेचा आणि आर्थिक व्यवहारांचा तपशीलच शोधत नाहीये, तर या प्रथेची पाळेमुळे खणून काढणार आहे. यापूर्वी अशा प्रकारचे व्यवहार झाले असल्यास, त्या दत्तक मुलांचे जन्मदाखले, शाळेतील दाखले आणि आधार कार्ड नेमके कशा प्रकारे तयार केले गेले? यंत्रणेतील कोणत्या त्रुटींचा किंवा व्यक्तींचा यात सहभाग होता? या सर्व बाबींचा छडा लावण्यात येणार आहे.
एका ग्रामस्थाने दिलेल्या माहितीनुसार, ग्रामीण भागातील मुलांना शाळेत केवळ 'पालकांनी सांगितलेल्या नावानेच' बसवले जात होते. यामुळे अनेक मुलांचे शासकीय कामकाजात रेकॉर्डच नव्हते, अपार आयडी तर दूरच. बेकायदेशीर दत्तक प्रक्रियांमुळे शासकीय यंत्रणेतील अनेक दोष आणि कमतरता उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कागदपत्रांअभावी शाळेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचाही आता शोध सुरू झाला असून, बेकायदेशीरपणे दत्तक गेलेल्या किती मुलांना स्वतःची खरी ओळख मिळाली आणि ती कशाप्रकारे, याचा तपास सुरू आहे. या तपासातून आणखी काही मोठे गैरप्रकार समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.






