समाधानचा वाढदिवस असल्याने तो सायंकाळी काही मित्रांसमवेत म्हसोबा बारी येथे केक कापण्यासाठी गेला होता. सर्व मित्रांनी समाधानला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. फोटो आणि व्हिडीओ काढून सर्वजण उत्साहाने सेलिब्रेशन करत होते.
स्टॅम्प पेपरवरचं लग्न पैशापुरतंच टिकलं, शेतकरी तरुणाला कसं फसवलं? 3 लाख घेतले अन्....
काळ आला अन...
नैसर्गिक विधीसाठी जात असल्याचे सांगून समाधान मित्रांमधून बाजूला झाला. जवळच असलेल्या मातीच्या ढिगाऱ्यावर पाय घसरल्याने तोल गेला आणि दुर्दैवाने तो खाली असलेल्या अतिउच्च वीजवाहिनीवर कोसळला. विजेचा जबरदस्त शॉक लागल्याने त्याने किंचाळी मारली. त्याचा आवाज ऐकून मित्रांनी धाव घेतली, मात्र तोपर्यंत समाधान विजेच्या तारेवर पडून मृत्युमुखी झाला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.
advertisement
एका कंपनीत काम करून कुटुंबाला हातभार लावणाऱ्या समाधानच्या आकस्मिक निधनाने मित्रपरिवाराला मोठा धक्का बसला आहे. वाढदिवसाच्या दिवशीच घडलेल्या या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.






