हापूसचीही चव पडेल फिकी! फॉरेनचा आंबा मुंबईच्या बाजारात, खरेदीसाठी लागल्या रांगाच रांगा, खासियत काय?

Last Updated:

Agriculture News :  हिवाळ्यात आंब्याचा आस्वाद घेण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.

Agriculture News
Agriculture News
मुंबई : हिवाळ्यात आंब्याचा आस्वाद घेण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. दक्षिण आफ्रिकेत पिकणारा आणि युरोपियन बाजारपेठेत अत्यंत लोकप्रिय असलेलाटॉमी अॅटकिन्सआंबा आता वाशीच्या मुंबई एपीएमसी फळबाजारात दाखल झाला आहे. मोसम सुरू होण्यापूर्वीच आंबा बाजारात आल्यानं आंबाप्रेमींना हिवाळ्याच्या दिवसांत आंब्याची चव चाखण्याची विशेष संधी उपलब्ध झाली आहे. तसेच खरेदीसाठीही लोकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.
advertisement
एपीएमसी बाजारात दर आठवड्याला या परदेशी आंब्याचे सुमारे 500 ते 600 बॉक्स दाखल होत आहेत. तेजस्वी लाल-सोनसळी रंग, आकर्षक देखावा आणि गोडसर चवीमुळे ‘टॉमी अॅटकिन्स’ आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठ्या प्रमाणावर पसंत केला जातो. वजनाने मोठा, चमकदार सालीचा आणि दीर्घ टिकाऊपणामुळे तो जगभरातील सुपरमार्केटमध्ये विशेष मागणी मिळवतो. भारतीय बाजारातही हा आंबा ‘लिली आंबा’ म्हणून ओळखला जातो.
advertisement
प्रत्येक बॉक्सचे वजन साधारण चार किलो असते आणि त्यात 10 ते 14 आंबे मिळतात. सध्या बाजारात इतर कोणत्याही प्रकारचा आंबा उपलब्ध नसल्यामुळे या आंब्याला मोठी मागणी आहे. याशिवाय देशभरात लग्नसराईचा मोसम सुरू असल्याने ग्राहक आंबा खरेदी करण्यास उत्सुक असल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.
advertisement
दक्षिण आफ्रिकेत काही भागांत यंदा अल्प पावसामुळे उत्पादनावर किंचित परिणाम झाला आहे. डिसेंबरच्या अखेरीस आयातीत आंब्यांची आवक काहीशी कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. परिणामी, पुढील काही आठवड्यांत या आंब्याच्या भावात वाढ होण्याचीही शक्यता बाजार समितीतील व्यापारी व्यक्त करत आहेत.
advertisement
मुंबईतील आंबा विक्रेते चिन्मय पानसरे म्हणाले, “सध्या भारतात लग्नसराईचा हंगाम असून ग्राहकांकडून टॉमी अॅटकिन्सची मागणी चांगली आहे. हिवाळ्यात आंबा मिळत असल्याने ग्राहकांची उत्सुकता वाढली आहे. रंग, सुगंध आणि मधुर चवीमुळे हा आंबा ग्राहकांना विशेष आवडतो.”
सध्या या आयातीत आंब्याचे दरही चांगले मिळत आहेत. एका बॉक्सची किंमत सुमारे 2500 ते 2700 रुपये दरम्यान आहे. आंब्याचा हंगाम साधारण 15 नोव्हेंबरपासून सुरू होऊन 15 जानेवारीपर्यंत चालतो. त्यामुळे हा आंबा भारतीयांसाठी दुर्मीळ मानला जातो.
advertisement
हिवाळ्याच्या काळात भारतात मिळणाऱ्या आंब्यांची उपलब्धता अत्यंत मर्यादित असते. त्यामुळे परदेशातून आयात होणारा ‘टॉमी अॅटकिन्स’ आंबा ग्राहकांसाठी आकर्षणाचा विषय ठरतो. आंबा प्रेमींना उन्हाळ्याआधी आंब्याची चव चाखण्याची संधी मिळते, हेच या आंब्याचे खास वैशिष्ट्य आहे.
दक्षिण आफ्रिकेच्या शेतांपासून थेट मुंबईच्या बाजारापर्यंतचा प्रवास पूर्ण करणारा हा तेजस्वी लालीचा ‘टॉमी अॅटकिन्स’ आंबा हिवाळ्यातही बाजारपेठेत रंगत आणत आहे. दर आठवड्याला शेकडो बॉक्सच्या आवकीमुळे आणि ग्राहकांकडून मिळणाऱ्या सकारात्मक प्रतिसादामुळे हा आयातीत आंबा सध्या मुंबईच्या फळबाजारात चर्चेचा विषय ठरला आहे.
advertisement
view comments
मराठी बातम्या/कृषी/
हापूसचीही चव पडेल फिकी! फॉरेनचा आंबा मुंबईच्या बाजारात, खरेदीसाठी लागल्या रांगाच रांगा, खासियत काय?
Next Article
advertisement
ZP Election Municipal elections : निवडणूक आयोगात घडामोडींना वेग, जिल्हा परिषद, महापालिका निवडणुकांसाठी नवीन प्लॅन
निवडणूक आयोगात घडामोडींना वेग, ZP, महापालिका निवडणुकांसाठी नवीन प्लॅन!
  • निवडणूक आयोगात घडामोडींना वेग, ZP, महापालिका निवडणुकांसाठी नवीन प्लॅन!

  • निवडणूक आयोगात घडामोडींना वेग, ZP, महापालिका निवडणुकांसाठी नवीन प्लॅन!

  • निवडणूक आयोगात घडामोडींना वेग, ZP, महापालिका निवडणुकांसाठी नवीन प्लॅन!

View All
advertisement