वाढदिवसाचं सेलिब्रेशन ठरलं शेवटचं! मित्रांसोबत पार्टीला गेला.., नाशिकच्या समाधानचा दुर्दैवी अंत

Last Updated:

Nashik News: नाशिकमध्ये एक दुर्दैवी घटना घडलीये. वाढदिवसाचं सेलिब्रेशन केल्यानंतर काही काळातच 19 वर्षीय तरुणानं जीव सोडला.

Nashik News: वाढदिवसाचं सेलिब्रेशन ठरलं शेवटचं! मित्रांसोबत पार्टीला गेला.., नाशिकच्या समाधानचा दुर्दैवी अंत
Nashik News: वाढदिवसाचं सेलिब्रेशन ठरलं शेवटचं! मित्रांसोबत पार्टीला गेला.., नाशिकच्या समाधानचा दुर्दैवी अंत
नाशिक:- ज्या दिवसाची आतुरता होती, तोच दिवस एका 19 वर्षीय तरुणासाठी अखेरचा ठरला. पंचवटीतील समाधान सुरेश ढुंदे (19, रा. धनपाडा, पेठ) या युवकाचा त्याच्या वाढदिवसाच्या दिवशीच विजेचा शॉक लागून करुण अंत झाला. नाशिकच्या पेठरोडवरील मनपाच्या प्रवेशद्वाराजवळ ही घटना घडली, ज्यामुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
समाधानचा वाढदिवस असल्याने तो सायंकाळी काही मित्रांसमवेत म्हसोबा बारी येथे केक कापण्यासाठी गेला होता. सर्व मित्रांनी समाधानला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. फोटो आणि व्हिडीओ काढून सर्वजण उत्साहाने सेलिब्रेशन करत होते.
काळ आला अन...
नैसर्गिक विधीसाठी जात असल्याचे सांगून समाधान मित्रांमधून बाजूला झाला. जवळच असलेल्या मातीच्या ढिगाऱ्यावर पाय घसरल्याने तोल गेला आणि दुर्दैवाने तो खाली असलेल्या अतिउच्च वीजवाहिनीवर कोसळला. विजेचा जबरदस्त शॉक लागल्याने त्याने किंचाळी मारली. त्याचा आवाज ऐकून मित्रांनी धाव घेतली, मात्र तोपर्यंत समाधान विजेच्या तारेवर पडून मृत्युमुखी झाला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.
advertisement
एका कंपनीत काम करून कुटुंबाला हातभार लावणाऱ्या समाधानच्या आकस्मिक निधनाने मित्रपरिवाराला मोठा धक्का बसला आहे. वाढदिवसाच्या दिवशीच घडलेल्या या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नाशिक/
वाढदिवसाचं सेलिब्रेशन ठरलं शेवटचं! मित्रांसोबत पार्टीला गेला.., नाशिकच्या समाधानचा दुर्दैवी अंत
Next Article
advertisement
Eknath Shinde Uddhav Thackeray: कोकणातून सुरुवात, राज्यातही सूर जुळणार? शिंदे गटात अस्वस्थता, मातोश्रीवर 'घरवापसी'च्या हालचाली!
कोकणातून सुरुवात, राज्यातही सूर जुळणार? शिंदे गटात अस्वस्थता, 'घरवापसी' होणार
  • कोकणातून सुरुवात, राज्यातही सूर जुळणार? शिंदे गटात अस्वस्थता, 'घरवापसी' होणार

  • कोकणातून सुरुवात, राज्यातही सूर जुळणार? शिंदे गटात अस्वस्थता, 'घरवापसी' होणार

  • कोकणातून सुरुवात, राज्यातही सूर जुळणार? शिंदे गटात अस्वस्थता, 'घरवापसी' होणार

View All
advertisement