भारतातील अनेक लोकांनी पेपर पाठवले आहेत. रामायणातील संदर्भाचे त्या त्या काळात ट्रान्सलेशन केलं गेलं आहे. इतिहास लिहायला तो माहिती असायला लागतो. वाल्मिकी रामायणाबद्दल कुणाला आक्षेप आहे का? असा प्रश्नही जितेंद्र आव्हाड यांनी विचारला. जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं की, मी कुठलही भाष्य अभ्यासाशिवाय केलं नाही. मात्र आज अभ्यासाला नाही तर भावनेला महत्त्व आहे. त्यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगीरी व्यक्त करतो.
advertisement
आव्हाडांच्या विधानावरून राष्ट्रवादीत खडाखडी, माजी मंत्र्याने दिला जीभेला आवर घालण्याचा सल्ला
जितेंद्र आव्हाड यांनी रामाबद्दल केलेल्या वक्तव्य प्रकरणी खेद व्यक्त केला आहे. ज्यांच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर खेद व्यक्त करतो. मी कुठलंही भाष्य अभ्यासाशिवाय करत नाही. आमचा राम जन्मापासून आमच्या हृदयात असल्याचंही ते म्हणाले. तुमचा राम निवडणुकीच्या बाजारात, आमचा राम आमच्या हृदयात आहे अशा शब्दात जितेंद्र आव्हाड यांनी विरोध करणाऱ्यांना सुनावले.
अबुधाबीत बसून बोलणं सोपं
दरम्यान, राष्ट्रवादीच्याच नेत्यांकडून घरचा आहेर दिला गेल्याबद्दल त्यांना विचारले असता म्हणाले की, पक्षात मी एकटा पडलो असतो तर एवढी लोकं माझ्या मागे उभा राहिली असती का? रोहित पवारांच्या प्रतिक्रियेवर त्यांनी रोहित पवार यांना मी फार महत्त्व देत नाही, ते अजून लहान आहेत. रोहित पवारांना मी फार महत्त्व देत नाही. रोहित पवार काय बोलतात याकडे मी लक्ष देत नाही. लढाई करताना माझ्यासोबत किती हे बघून उतरलो तर आयुष्यात लढाई शक्य नाही असंही जितेंद्र आव्हाड यावेळी म्हणाले.