निलेश घायवळ हा पुण्यातील मोठा गुंड आहे. हत्येचा प्रयत्न, खंडणी, अपहरण, हाणामारी यासारखे गंभीर गुन्हे त्याच्या नावावर आहेत. किंबहुना 'मकोका'सारखा गंभीर गुन्हाही त्याच्या नावावर आहे. असे गंभीर गुन्हे नावावर असलेल्या संबंधित आरोपी तसेच नामचिन गुन्हेगाराचा पासपोर्ट पोलीस जप्त करतात. मात्र घायवळ प्रकरणात पोलिसांनी पासपोर्ट जप्त का केला नाही, अशी विचारणा पोलिसांकडे होत आहे.
advertisement
लूक आऊट नोटीस जारी, भारतात येताच अटक करणार
निलेश घायवळने पासपोर्ट आपल्याकडे जमाच केला नाही, असे पोलिसांचे म्हणणे आहे. निलेश घायवळ याच्याबाबत लूक आऊट नोटीस जारी करण्यात आली असून भारतात परत येताच त्याला अटक करण्यात येईल, असे स्पष्टीकरण पुणे पोलिसांनी दिले आहे.
गुन्हेगारी कृत्यांमधून अमाप संपत्ती जमवली, लंडनमध्ये घर घेतले
निलेश घायवळने गुन्हेगारी कृत्यांमधून खूप मोठ्या प्रमाणात पैसा कमावला असून त्यातून त्याने लंडनमध्ये घर घेतले आहे. तसेच त्याचा मुलगा लंडनमध्ये शिक्षण घेत असल्याचे देखील पोलिसांनी सांगितले.
निलेश घायवळ कोण आहे?
निलेश घायवळ हा एक गुन्हेगारांच्या टोळीचा प्रमुख असून त्याच्यावर अनेक गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. निलेश घायवळ हा मूळचा अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेडच्या सोनेगावचा आहे. पुण्यातील कुख्यात गुंड म्हणून ओळखला जातो. निलेश घायवळची पुण्यात मोठी दहशत आहे. निलेश घायवळ हा जामखेडवरून पुण्यात शिक्षण घेण्यासाठी आला. मात्र पुण्यात आल्यावर त्याने गुन्हेगारी जगतात प्रवेश केला. गजा मारणे टोळीशी निलेश घायवळ याचा संबंध आहे.