TRENDING:

मनोज जरांगेंचं आंदोलन जोमात, ओबीसी बांधव खवळले, साखळी आंदोलनाची ठिणगी पेटली

Last Updated:

OBC Reservation: ओबीसी समाजावर अन्याय होऊ नये यासाठी ओबीसी नेत्यांसोबत ओबीसी समाजही मुंबईत कूच करण्याच्या तयारीत आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : मराठा आरक्षणासाठी मुंबईत मनोज जरांगेंचं आंदोलन सुरु असतानाच राज्यभरातला ओबीसी समाज आक्रमक झालाय. मराठ्यांना शांत करण्यासाठी आमच्या वाट्याचं आरक्षण कुणाच्याही पदरात टाकू नये अशी आक्रमक भूमिका आता राज्यातल्या ओबीसींनी घेतलीये. समाजावर अन्याय होऊ नये यासाठी ओबीसी नेत्यांसोबत ओबीसी समाजही मुंबईत कूच करण्याच्या तयारीत आहे.
मनोज जरांगे पाटील-बबनराव तायवाडे
मनोज जरांगे पाटील-बबनराव तायवाडे
advertisement

मुंबईच्या आझाद मैदानात मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी ठाण मांडून बसलेत. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याची जरांगेची आग्रही मागणी आहे. तर दुसरीकडे ओबीसी समाजही आपल्या आरक्षणात कुणी वाटेकरी नको यासाठी आक्रमक झालाय. मुंबईतल्या जरांगेच्या आंदोलनाला उत्तर म्हणून नागपुरात शनिवारपासून राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने साखळी उपोषणाला सुरुवात झालीये.

बबनराव तायवाडेंच्या अध्यक्षतेत सुरु असलेल्या या आंदोलनात पहिल्याच दिवशी सर्वपक्षीय नेते सहभागी झाले काँग्रेसचे खासदार नामदेव किरसान, माजी आमदार अशोक धवड, अपक्ष भाजपचे आमदार परिणय फुके, आशिष देशमुख, माजी आमदार सुधाकर देशमुख, रमेश शिंगारे यांनी या उपोषण स्थळाला भेट देत आपले समर्थन दिले.

advertisement

ओबीसीच्या आरक्षणाला जर सरकारने धक्का लावण्याचा प्रयत्न केला तर साखळी उपोषणाचे रुपांतर आमरण उपोषणात करण्याचा इशाराही ओबीसी महासंघाने दिलाय. सोबतच मुंबईत मोठ्या संख्येने कूच करत जरांगे पाटलांच्या आंदोलनाला तोडीस तोड उत्तर देण्याची भूमिका घेतलीये.

ओबीसीच्या आरक्षणाला जर सरकारने धक्का लावण्याचा प्रयत्न केला तर साखळी उपोषणाचं रुपांतर आमरण उपोषणात करण्याचा इशाराही ओबीसी महासंघाने दिलाय. सोबतच मुंबईत मोठ्या संख्येने कूच करत जरांगे पाटलांच्या आंदोलनाला तोडीस तोड उत्तर देण्याची भूमिका घेतलीये.

advertisement

जरांगे पाटलांचं आंदोलन आणि ओबीसी बांधवांचा आक्रमक पवित्रा यामुळे राज्य सरकार कात्रीत सापडलं आहे. यावर तोडगा काढताना सरकारची कसोटी लागणार आहे. आता या दोन्ही समाजांना नाराज न करता त्यांच्या अपेक्षांची पूर्ती सरकार कसं करणार, ही तारेवरची कसरत कशी साधणार हे पाहणं महत्त्वाचं असेल.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
मनोज जरांगेंचं आंदोलन जोमात, ओबीसी बांधव खवळले, साखळी आंदोलनाची ठिणगी पेटली
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल