TRENDING:

Ovala Majiwada Vidhan Sabha : सरनाईकांच्या गडाला ठाकरेंचा शिलेदार पाडेल का खिंडार? ओवळा-माजिवाड्यात सेना विरुद्ध सेना

Last Updated:

Maharashtra Elections Ovala Majiwada Vidhan Sabha: ओवळा माजिवडा मतदारसंघात सेना विरुद्ध सेना अशी थेट लढत होणार असून माजी उपमहापौर नरेश मणेरा यांना उद्धव ठाकरे गटाने रिंगणात उतवलं आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
ठाणे  :  ठाणे शहरात येणाऱ्या विधानसभा मतदारसंघांपैकी एक आहे ओवळा माजिवाडा. ठाणे जिल्ह्यात 18 विधानसभा मतदारसंघ येतात. त्यापैकी 6 ठाणे लोकसभा मतदारसंघाचा भाग आहेत. त्यातील एक ओवळा माजिवडा. गेल्या पंधरा वर्षांत विस्तारलेल्या ठाणे शहराचा हा मतदारसंघ असला तरी यात ठाणे महापालिकेबरोबर मीरा- भाईंदर महानगरपालिकेतील काही भागही येतो. शिवसेना नेते प्रताप सरनाईक हे विद्यमान आमदार आहेत. ते शिंदे समर्थक आहेत. यावेळी महायुतीचे उमेदवार म्हणून त्यांनी अर्ज दाखल केला आहे. ओवळा माजिवडा मतदारसंघात सेना विरुद्ध सेना अशी थेट लढत होणार असून माजी उपमहापौर नरेश मणेरा यांना उद्धव ठाकरे गटाने रिंगणात उतवलं आहे.
प्रताप सरनाईकांच्या गडाला उद्धव ठाकरेंचा शिलेदार पाडेल का खिंडार? ओवळा-माजिवाड्यात सेना वि. सेना
प्रताप सरनाईकांच्या गडाला उद्धव ठाकरेंचा शिलेदार पाडेल का खिंडार? ओवळा-माजिवाड्यात सेना वि. सेना
advertisement

ओवळा माजिवाडा विधानसभा मतदारसंघ इतिहास

आमदार प्रताप सरनाईक यांची या मतदारसंघावर घट्ट पकड आहे. गेली 15 वर्षं ओवळा-माजिवाड्याची आमदारकी सरनाईक यांच्याकडेच आहे. सरनाईक हे एकनाथ शिंदे यांच्या बंडातील खंदे कार्यकर्ते. भाजपविरोधात महाविकास आघाडीत सामील व्हायला विरोध करणाऱ्या पहिल्या काही आमदारांपैकी एक. त्यांनी उद्धव ठाकरेंना त्या वेळी पत्र लिहून आपली नाराजीही दर्शवली होती. पण अर्थातच ठाकरेंनी त्याकडे दुर्लक्ष केलं आणि 2022 मध्ये झालेल्या सेनेतील बंडात एकनाथ शिंदेंबरोबर खंदे साथीदार म्हणून सरनाईक उभे राहिले.

advertisement

2009 साली मतदारसंघ पुनर्ररचना झाल्यानंतर विस्तारलेल्या ओवळा माजिवाडा मतदारसंघातून सलगपणे सरनाईक निवडून येत आहेत. 2014 साली सेना-भाजप युती निवडणुकीपूर्वी नव्हती त्या वेळी शिवसेना, भाजप, मनसे, राष्ट्रवादी, काँग्रेस सगळ्याच पक्ष्यांचे उमेदवार रिंगणात होते. तेव्हाही 10 हजारहून अधिक मताधिक्याने सरनाईक निवडून आले होते. त्या वर्षी भाजप उमेदवार संजय पांडे दुसऱ्या क्रमांकावर आणि राष्ट्रवादीचे हेमंद जगदाळे यांनी तिसऱ्या क्रमांकावरची मतं घेतली होती.

advertisement

या वर्षी शिवसेनेप्रमाणेच राष्ट्रवादीतही उभी फूट पडली आहे. मनसेही आहेच. त्यामुळे सगळीच राजकीय समीकरणं बदलली आहेत. शिवसेना (उबाठा) पक्षाचे उमेदवार असणारे नरेश मणेरा ठाण्याचे माजी महापौर राहिले आहेत.

2019 विधानसभा निवडणुकीत काय झालं?

2019 च्या निवडणुकीत सेना-भाजप युती विरुद्ध राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडी असा सामना झाला. त्या वेळी 84 हजारांच्या मताधिक्याने प्रताप सरनाईक निवडणूक जिंकले होते.

advertisement

प्रताप सरनाईक – शिवसेना – 117,593

विक्रांत चव्हाण – काँग्रेस - 33,585

संदीप पाचंगे – मनसे - 21,132

2024 लोकसभा निवडणुकीला काय झालं?

ठाणे लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ येतात. त्यापैकी एक कोपरी-पांचपाखाडी विधानसभा मतदारसंघ आहे. सहापैकी मिरा भाईंदरच्या अपक्ष आमदार सोडल्यास बाकी सगळ्या विधानसभांचे आमदार महायुतीत आहेत. तीन भाजप आणि उर्वरित दोन शिवसेनेचे आमदार आहेत.

advertisement

ठाण्यात प्रथमच दोन सेनांविरुद्धचा सामना लोकसभा निवडणुकीच्या वेळी रंगला. माजी खासदार राजन विचारे हे उद्धव ठाकरेंचं समर्थक विरुद्ध एकनाथ शिंदेंचे समर्थक शिवसेना नेते नरेश म्हस्के यांच्यात थेट लढत झाली. नरेश म्हस्के खासदार म्हणून निवडून आले आणि एकनाथ शिंदेंची ठाण्यातली ताकद लक्षात आली. नरेश म्हस्के यांना सर्वाधिक मताधिक्य ओवळा माजिवडा या प्रताप सरनाईकांच्या मतदारसंघातून मिळालं होतं. मस्के यांना या क्षेत्रातून 62429 एवढं मताधिक्य मिळालं. त्यामुळे अर्थातच ठाण्याबाबतचा शिवसेनेचा आणि महायुतीचा विश्वास वाढलेला आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या सगळ्याच विधानसभा क्षेत्रांतून नरेश म्हस्के यांना मताधिक्य मिळालं होतं.

ठाणे लोकसभा मतदारसंघातील 2019 चं चित्र

मिरा भाईंदर - गीता जैन (अपक्ष)

ओवळा माजिवडा - प्रताप सरनाईक (शिवसेना शिंदे गट)

कोपरी पाचपाखाडी - एकनाथ शिंदे (शिवसेना शिंदे)

ठाणे - संजय केळकर (भाजप)

ऐरोली - गणेश नाईक (भाजप)

बेलापूर - मंदा म्हात्रे (भाजप)

ठाणे जिल्ह्यातील इतर विधानसभा मतदारसंघ

ठाणे जिल्ह्यात18 विधानसभा मतदारसंघ येतात. त्यापैकी 6 ठाणे लोकसभा मतदारसंघाचा भाग आहेत.

भिवंडी ग्रामीण - शांताराम मोरे (शिवसेना)

शहापूर - दौलत दरोडा (राष्ट्रवादी)

भिवंडी पश्चिम - महेश प्रभाकर चौगुले (भाजप)

भिवंडी पूर्व - रईस शेख (समाजवादी पार्टी)

कल्याण ग्रामीण - प्रमोद (राजू) पाटील (मनसे)

मुरबाड - किसन कथोरे (भाजप)

अंबरनाथ - बालाजी किणीकर (शिवसेना)

उल्हासनगर - कुमार आयलानी (भाजप)

कल्याण पूर्व - गणपत गायकवाड (भाजप)

डोंबिवली - रवींद्र चव्हाण (भाजप)

कल्याण पश्चिम -विश्वनाथ भोईर (शिवसेना)

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
हॉटेलसारखी बिर्याणी घरीच बनवा, ही पद्धत आजपर्यंत कुणीच सांगितली नसेल! Video
सर्व पहा

मुंब्रा-कळवा -जितेंद्र आव्हाड (राष्ट्रवादी- शरदचंद्र पवार)

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Ovala Majiwada Vidhan Sabha : सरनाईकांच्या गडाला ठाकरेंचा शिलेदार पाडेल का खिंडार? ओवळा-माजिवाड्यात सेना विरुद्ध सेना
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल