पोलिसांनी ३८ वर्षीय महिलेला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धनसार येथील एका घरात ही अमानुष घटना घडली. मुलाने आईकडे जेवणामध्ये चिकन बनवण्याची मागणी केली होती. या मागणीमुळे संतप्त झालेल्या ३८ वर्षीय आईने चिमुकल्याच्या डोक्यावर लाटणीने जोरदार प्रहार केला.
हा घाव वर्मी लागल्याने चिमुकल्याच्या डोक्याला गंभीर इजा झाली. यातच त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून, संताप व्यक्त केला जात आहे.
advertisement
निर्दयी आईला अटक
या घटनेची माहिती मिळताच पालघर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी आरोपी आईला तिच्या घरातून अटक केली. पोलिसांनी आरोपी महिलेविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. केवळ चिकन मागितल्याच्या कारणातून आईनं अशाप्रकारे मुलाची हत्या केल्याने परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. घटनेचा पुढील तपास केला जात आहे.