पालघरच्या डहाणू विधानसभेत शिवसेना शिंदे गटाने मोठा डाव टाकत नगरपरिषद हद्दीतील बड्या नेत्यांना आपल्या गळाला लावल आहे. डहाणू नगरपरिषद हद्दीतील बड्या नेत्यांपैकी एक असलेल्या डहाणू नगर परिषदेच्या माजी उपनगराध्यक्ष राजू माच्छी यांच्यासह अनेक माजी नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केला.दरम्यान राजू माच्छी यांच्यासह डहाणू नगरपरिषद मधील सहा माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर पक्ष प्रवेश केला.
advertisement
राजू माच्छी आणि त्यांच्यासोबत पक्षात आलेल्या पदाधिकाऱ्यांमुळे डहाणू नगरपरिषदेत शिवसेना शिंदे गट स्वबळाची तयारी करत असल्याच्या जोरदार चर्चा सध्या सुरू झाल्या आहेत. विशेष म्हणजे डहाणू नगरपरिषदेवर नगराध्यक्ष पदासाठी भाजपचे जिल्हाध्यक्ष भरत राजपूत हेच दावा करत असल्याचं समोर येत असतानाच राजू माच्छी यांच्या शिवसेना प्रवेशामुळे भाजपच्या जिल्हाध्यक्षांनाच मोठ आवाहन निर्माण झाल आहे.
या पक्षप्रवेशाने येत्या नगरपरिषद निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना शिंदे गटाने आपला मित्र पक्ष असलेल्या भाजप सह राष्ट्रवादी,शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का दिला आहे.