TRENDING:

पाटण विधानसभा निवडणूक 2024: पाटणचा गड कोण राखणार, तिसंगी लढत होणार का?

Last Updated:

Patan Assembly Constituency Maharashtra Assembly Election 2024: पाटणमध्ये शंभुराज देसाई विरुद्ध हर्षद कदम अशी लढत होणार आहे. पण सत्यजितसिंह पाटणकरांनी बंडाचा पवित्रा घेतल्याने तिरंगी लढत होऊ शकते.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
सातारा: सातारा जिल्ह्यातील महत्त्वाचामतदारसंघ आहे पाटण विधानसभा मतदारसंघ. जागावाटपापासून धक्के देणारा हा मतदारसंघ. शिवसेनेते शंभुराज देसाई हे विद्यमान आमदार आहेत. पाटण विधानसभा मतदारसंघात पारंपरिकपणे देसाई आणि पाटणकर यांच्यात लढत होते. यामुळे या विधानसभा निवडणुकीत ही जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे जाईल आणि तिथे सत्यजितसिंह पाटणकर यांना उमेदवारी मिळेल अशी शक्यता होती. मात्र, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून हर्षद कदम यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. पाटणमध्ये शंभुराज देसाई विरुद्ध हर्षद कदम अशी लढत होणार आहे. पण सत्यजितसिंह पाटणकरांनी बंडाचा पवित्रा घेतल्याने तिरंगी लढत होऊ शकते.
पाटण विधानसभा मतदारसंघ
पाटण विधानसभा मतदारसंघ
advertisement

पाटण विधानसभा मतदारसंघ इतिहास

सातारा जिल्ह्यातील काँग्रेस , राष्ट्रवादी पाटणमध्ये मोडण्याचं काम शंभुराज देसाई यांनी केलं होतं. पाटणमध्ये सुरुवातीपासून पाटणकर आणि देसाई यांच्यात लढती होत आहेत. 2004 मध्ये शंभुराज पहिल्यांदा शिवसेनेच्या तिकिटावर पाटणचे आमदार झाले. त्यानंतर 2014 आणि 2019 मध्ये ते निवडणूक जिंकले.

2019 विधानसभा निवडणुकीला काय झालं?

शंभुराज देसाई – शिवसेना - 104,419

advertisement

सत्यजितसिंह पाटणकर – राष्ट्रवादी - 85,595

गेल्या विधानसभा निवडणुकीत सत्यजितसिंह पाटणकरांचा देसाईंनी 18,824 मतांनी पराभव केला. या निवडणुकीत आघाडीच्या जागावाटप वादात पाटणची सीट अडकली होती. पण उबाठा शिवसेनेच्या यादीत पाटणचं नाव आल्याने पाटणकरांना धक्का बसला. हर्षद कदम यांना उद्धव ठाकरेंनी तिकिट दिलं. आता पाटणकराचां पवित्रा काय, यावरून पाटणचं भवितव्य ठरू शकतं.

advertisement

बेलापूर विधानसभा निवडणूक 2024: वडील शेजारच्या जागेवर भाजपकडून रिंगणात तर मुलाने धरली तुतारी; बेलापूरमध्ये तिरंगी लढत

2024 लोकसभा निवडणुकीत काय झालं?

पाटण विधानसभा मतदारसंघ सातारा लोकसभा मतदारसंघात येतो. साताऱ्यात या लोकसभा निवडणुकीच्या वेळी हाय व्होल्टेज उमेदवार होते. महाविकास आघाडीचे शशिकांत शिंदे विरुद्ध महायुतीचे उदयनराजे भोसले यांच्यात लढत झाली. भाजपचे उदयनराजे यांनी निवडणुकीत बाजी मारली. त्यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या शशिकांत शिंदे यांचा उदयनराजे यांना 5 लाख 71 हजार 134 मते मिळाली. त्यांनी शिंदे यांचा 32771 मतांच्या फरकाने पराभव केला. सातार लोकसभेवर यंदा पहिल्यांदाच भाजपाचा खासदार झाला आहे. त्यामुळे साताऱ्यातील भाजपाच्या वाट्याला येणाऱ्या विधानसभा मतदारसंघात विजय प्राप्त करण्याची जबाबदारी पक्षाने उदयनराजेंकडे दिली असल्याच्या बातम्या आहेत.

advertisement

लोकसभा निवडणुकीत पाटण विधानसभा क्षेत्रातून उदयनराजे पिछाडीवर होते. त्यांना केवळ 75460 मतं मिळाली तर शशिकांत शिंदे यांना 78403 मतं मिळाली. त्यामुळे शंभुराज देसाईंना मेहनत करावी लागणार आहे.

सातारा जिल्ह्यातील विद्यमान आमदार आणि त्यांची भूमिका

1. सातारा जावळी- शिवेंद्रराजे भोसले- भाजप

2. वाई - मकरंद पाटील – राष्ट्रवादी

3. फलटण- दीपक चव्हाण – राष्ट्रवादी शरदचंद्र पवार

advertisement

4. माण खटाव- जयकुमार गोरे- भाजप

5. कोरेगाव- महेश शिंदे- शिवसेना

6. कराड उत्तर - बाळासाहेब पाटील – राष्ट्रवादी शरदचंद्र पवार

7. कराड दक्षिण - पृथ्विराज चव्हाण - कॉंग्रेस

8. पाटण - शंभुराजे देसाई – शिवसेना

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
अतिवृष्टीचा फटका, बबन यांच्या सीताफळाचे मोठं नुकसान, खर्च निघणे झालं अवघड
सर्व पहा

भायखळा विधानसभा निवडणूक 2024: लोकसभेच्या पराभवातून सावरत यामिनी जाधव सावरणार का भायखळ्याचा गड?

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
पाटण विधानसभा निवडणूक 2024: पाटणचा गड कोण राखणार, तिसंगी लढत होणार का?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल