बेलापूर विधानसभा निवडणूक 2024: वडील शेजारच्या जागेवर भाजपकडून रिंगणात तर मुलाने धरली तुतारी; बेलापूरमध्ये तिरंगी लढत

Last Updated:

Belapur Assembly Election 2024: वडील गणेश नाईक शेजारच्या ऐरोली मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर उभे आहेत तर मुलाने महाविकास आघाडीला आपलंसं केलं आहे.

Belapur Assembly Election 2024
Belapur Assembly Election 2024
बेलापूर: ठाणे लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ येतात. त्यापैकी एक बेलापूर विधानसभा मतदारसंघ आहे. नवी मुंबईचा परिसर या मतदारसंघात येतो. नाईक परिवाराच्या वर्चस्वाचा हा परिसर होता. पण गेली दोन टर्म्स भाजपच्या मंदा म्हात्रे बेलापूरमधून निवडून येत आहेत.
विद्यमान आमदार मंदा म्हात्रे यांनाच महायुतीने यंदाही तिकिट दिलं आहे. मनसेकडून गजानन काळे यांना निवडणुकीच्या रिंगणात आहेत. बेलापूर विधानसभा मतदारसंघातून भाजपने उमेदवारी न दिल्याने नाराज झालेले संदीप नाईक म्हणजे गणेश नाईक यांचे सुपुत्र. त्यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात प्रवेश केला आणि हाती तुतारी घेऊन ते बेलापुरातून उभे राहिले आहेत. वडील गणेश नाईक शेजारच्या ऐरोली मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर उभे आहेत तर मुलाने महाविकास आघाडीला आपलंसं केलं आहे.
advertisement

बेलापूर विधानसभा मतदारसंघाचा इतिहास

ठाणे जिल्ह्यातील बेलापूर विधानसभा मतदारसंघाचं विभाजन होऊन ऐरोली आणि बेलापूर असे दोन भाग पडले. सध्या भाजपमध्ये असलेल्या गणेश नाईक यांचाच हा मतदारसंघ होता. या भागात त्यांचं वर्चस्व असलं तरी 2008 नंतर मतदारसंघ पुनर्रचना झाल्यानंतर गणेश नाईक ऐरोलीतून रिंगणात उतरत आहेत. यंदाही गणेश नाईकांना भाजपने ऐरोलीतून तिकिट दिलं आहे. पण मुलगा संजीव नाईक यांना महायुतीने बेलापूरमध्ये तिकिट द्यावं म्हणून ते आग्रही होते. पण मंदा म्हात्रेंचं नाव निश्चित झाल्याने संजीव नाईक यांनी पक्ष बदलत उमेदवारी पदरात पाडून घेतली.
advertisement
कुलाबा विधानसभा निवडणूक 2024: राहुल नार्वेकरांविरोधात काँग्रेसने दिला मारवाडी उमेदवार; कुलाब्यात मराठी विरुद्ध अमराठी संघर्ष?
गणेश नाईक देखील सुरुवातीला शिवसेना, मग राष्ट्रवादी आणि आता भाजपमध्ये आहेत. 1990, 1995 च्या सलग दोन निवणुका ते शिवसेनेकडून तिकिट मिळवून आमदार झाले. 2004 आणि 2009 ला ते राष्ट्रवादीकडून आमदार झाले. 2014 च्या निवडणुकीत भाजपच्या मंदा म्हात्रे यांनी अटीतटीच्या लढतीत नाईक यांचा पराभव केला होता. फक्त दीड हजार मतांनी त्या निवडून आल्या. पण त्या वेळी शिवसेना आणि भाजप स्वतंत्रपणे निवडणुकीत होते.
advertisement
पुढे 2019 मध्ये भाजप-शिवसेना महायुतीच्या उमेदवार म्हणून मंदा म्हात्रे यांनी पुन्हा एकदा सुमारे 44 हजार मतांनी विजय मिळविला.

2019 विधानसभा निवडणूक निकाल

  • मंदा म्हात्रे – भाजप – 87,858
  • अशोक गावडे – राष्ट्रवादी  - 44,261
  • गजानन काळे  - मनसे - 27,618

2024 लोकसभा निवडणुकीत काय झालं?

ठाणे लोकसभा क्षेत्रातील सहापैकी मिरा भाईंदरच्या अपक्ष आमदार सोडल्यास बाकी सगळ्या विधानसभांचे आमदार महायुतीत आहेत. तीन भाजप आणि उर्वरित दोन शिवसेनेचे आमदार आहेत.
advertisement
लोकसभेला ठाण्यात प्रथमच दोन सेनांविरुद्धचा सामना लोकसभा निवडणुकीच्या वेळी रंगला. माजी खासदार राजन विचारे हे उद्धव ठाकरेंचं समर्थक विरुद्ध एकनाथ शिंदेंचे समर्थक शिवसेना नेते नरेश म्हस्के यांच्यात थेट लढत झाली. नरेश म्हस्के खासदार म्हणून निवडून आले आणि एकनाथ शिंदेंची ठाण्यातली ताकद लक्षात आली.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत बेलापूर विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांना केवळ 12312 चं मताधिक्य मिळालं.
advertisement

ठाणे लोकसभा मतदारसंघातील 2019 चं  चित्र

  • मिरा भाईंदर - गीता जैन (अपक्ष)
  • ओवळा माजिवडा - प्रताप सरनाईक (शिवसेना शिंदे गट)
  • कोपरी पाचपाखाडी - एकनाथ शिंदे (शिवसेना शिंदे)
  • ठाणे - संजय केळकर (भाजप)
  • ऐरोली - गणेश नाईक (भाजप)
  • बेलापूर - मंदा म्हात्रे (भाजप)

ठाणे जिल्ह्यातील इतर विधानसभा मतदारसंघ

ठाणे जिल्ह्यात18 विधानसभा मतदारसंघ येतात. त्यापैकी 6 ठाणे लोकसभा मतदारसंघाचा भाग आहेत.
advertisement
  • भिवंडी ग्रामीण - शांताराम मोरे (शिवसेना)
  • शहापूर -  दौलत दरोडा (राष्ट्रवादी)
  • भिवंडी पश्चिम - महेश प्रभाकर चौगुले (भाजप)
  • भिवंडी पूर्व - रईस शेख (समाजवादी पार्टी)
  • कल्याण ग्रामीण -  प्रमोद (राजू) पाटील (मनसे)
  • मुरबाड - किसन कथोरे (भाजप)
  • अंबरनाथ -  बालाजी किणीकर (शिवसेना)
  • उल्हासनगर - कुमार आयलानी (भाजप)
  • कल्याण पूर्व - गणपत गायकवाड (भाजप)
  • डोंबिवली - रवींद्र चव्हाण (भाजप)
  • कल्याण पश्चिम -विश्वनाथ भोईर (शिवसेना)
  • मुंब्रा-कळवा  -जितेंद्र आव्हाड (राष्ट्रवादी- शरदचंद्र पवार)
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
बेलापूर विधानसभा निवडणूक 2024: वडील शेजारच्या जागेवर भाजपकडून रिंगणात तर मुलाने धरली तुतारी; बेलापूरमध्ये तिरंगी लढत
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement