Uddhav Thackeray Interview : सातत्याने व्होट जिहादचा आरोप, उद्धव यांचं ठाकरी भाषेत उत्तर, भाजपला 'आरसा' दाखवला!

Last Updated:

मुळचा भाजप आता राहिलेला नाही. आत्ताचा भाजप पक्ष हा अनैसर्गिक आहे. त्यामुळेच मोदी-शाहांची पकड ढिली होत चाललीय, असा हल्लाबोल देखील ठाकरेंनी भाजपवर केला.

उद्धव ठाकरेंची विशेष मुलाखत
उद्धव ठाकरेंची विशेष मुलाखत
Uddhav Thackeray Interview  : लोकसभा निवडणुकीपासून उद्धव ठाकरेंवर सातत्याने भाजपकडून व्होट जिहादचा आरोप होतोय.याच आरोपांवर आता ठाकरेंनी न्यूज 18 लोकमतच्या मुलाखतीत ठाकरी शैलीत उत्तर दिलं आहे. भाजपने पक्षातील सर्व मुस्लिमांना बाहेर काढावं,एकालाही ठेवू नये आणि पक्ष कार्यालयात पाटी लावावी. आमच्या पक्षात मुस्लिमांना बंदी आहे हे जाहीर करावे, असे ठाकरेंनी भाजपला स्पष्टच म्हटलं आहे.
व्होट जिहादच्या आरोपावर ठाकरे म्हणाले की, ज्यांच्या डोक्यात मेंदू नावाच चीज नाहीयेत, अशी माणसे असे विधान करतायात, असा टोला ठाकरेंनी भाजपला लगावला आहे. पुढे ठाकरे म्हणाले, जरं असेच असेल तर भाजपने पक्षातील सर्व मुस्लिमांना बाहेर काढावं, कुणीच राहु नये, आणि पक्ष कार्यालयात पाटी लावावी. आमच्या पक्षात मुस्लिमांना बंदी आहे,असा सल्ला ठाकरेंनी दिला आहे.
advertisement
ठाकरेंनी पुढे भाजपच्या चुकीच्या धोऱणांचा पाढाच वाचला. शेतकऱ्यांविषयीची धोरणं चुकीची आहे. आमच्या काळात चांगला दर मिळत होता. शेतकऱ्यांसाठी जीएसटी कुठे कमी केला? त्यामुळे 10 वर्षं लोकांनी फक्त थापा ऐकल्यात,अशी टीका ठाकरेंनी भाजपवर केली. मुळचा भाजप आता राहिलेला नाही. आत्ताचा भाजप पक्ष हा अनैसर्गिक आहे. त्यामुळेच मोदी-शाहांची पकड ढिली होत चाललीय, असा हल्लाबोल देखील ठाकरेंनी भाजपवर केला.
advertisement
मुख्यमंत्री पदावर काय म्हणाले? 
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? याबाबतचे संकेत दिले आहे.त्यामुळे महायुतीत बाकी पक्षाला विश्वासात घेत नाही, असा टोला ठाकरेंनी शिंदे, अजित पवारांना लगावला आहे. तसेच आम्ही एकत्रीत पणाने आमचा मुख्यमंत्री कोण होणार ते चर्चा करून ठरवू, असे ठाकरे म्हणाले आहेत.
view comments
मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/
Uddhav Thackeray Interview : सातत्याने व्होट जिहादचा आरोप, उद्धव यांचं ठाकरी भाषेत उत्तर, भाजपला 'आरसा' दाखवला!
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement