Dahanu Nagar Parishad Election Result : मतदारांनी कोणाची 'लंका 'जाळली? डहाणूत मोठा उलटफेर, प्रतिष्ठेच्या लढतीत कोणाचा गुलाल उधळला?

Last Updated:

Dahanu Election : पालघर जिल्ह्यातील डहाणू नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीकडे सध्या सगळ्याच राजकीय पक्षाचं लक्ष लागलं आहे.

मतदारांनी कोणाची 'लंका 'जाळली? डहाणूत मोठा उलटफेर, प्रतिष्ठेच्या लढतीत कोणाचा गुलाल उधळला?
मतदारांनी कोणाची 'लंका 'जाळली? डहाणूत मोठा उलटफेर, प्रतिष्ठेच्या लढतीत कोणाचा गुलाल उधळला?
राहुल पाटील, प्रतिनिधी, पालघर: पालघर जिल्ह्यातील डहाणू नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीकडे सध्या सगळ्याच राजकीय पक्षाचं लक्ष लागलं आहे. नगराध्यक्ष पदासाठी दोनच उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गट आणि भाजप आमने-सामने आले आहेत. विशेष बाब म्हणजे भाजप विरोधात या नगरपरिषदेत सर्वच राजकीय पक्ष एकवटल्याच पाहायला मिळालं.
शिवसेना शिंदे गटाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांनी पाठिंबा दिला होता. या ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी आणि दोन्ही शिवसेना एकत्र आल्याच चित्र दिसून आलं. एका थेट नगराध्यक्ष पदासह 27 नगरसेवक पदाच्या जागांसाठी होणाऱ्या या डहाणू नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत भाजपने भाजपचे जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली होती. तर दुसऱ्या बाजूला शिवसेना शिंदे गटाने राजेंद्र माच्छी यांना उमेदवारीचा रिंगणात उतरवल आहे. डहाणूत भाजपची मोठी ताकत असली तरी शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवाराला सर्वच राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला असून मागील काळातील अनेक माजी नगराध्यक्ष आणि माजी उपनगराध्यक्षांनी भाजप विरोधात दंड थोपटल्याचं दिसून आलं.
advertisement

>> डहाणूत भाजपला धक्का, शिंदे-मविआची सरशी

डहाणू नगर परिषदेची निवडणूक भाजपसाठी महत्त्वासाठी होती. डहाणूजवळ असलेल्या वाढवण बंदरासह इतर महत्त्वकांक्षी प्रकल्पासाठी डहाणू महत्त्वाचं ठरलं आहे. शिवसेना शिंदे गट आणि भाजपसाठी प्रतिष्ठेची असलेल्या डहाणू नगर परिषदेत देखील शिवसेना शिंदे गटाने मुसंडी मारली असून शिवसेना शिंदे गटाचे राजेंद्र माच्छी तीन हजारांच्या मताधिक्याने विजयी झाले.
advertisement
डहाणू नगर परिषदेत शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक भाजप पेक्षा कमी निवडून आले असले तरी येथील नगराध्यक्ष पदासाठी शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये चांगलीच जिंकल्याच पाहायला मिळालं. भाजपला एकाकी पडत शिवसेना शिंदे गटाने इतर सर्व राजकीय पक्षांचा पाठिंबा मिळवला
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Dahanu Nagar Parishad Election Result : मतदारांनी कोणाची 'लंका 'जाळली? डहाणूत मोठा उलटफेर, प्रतिष्ठेच्या लढतीत कोणाचा गुलाल उधळला?
Next Article
advertisement
Dahanu Nagar Parishad Election Result : मतदारांनी कोणाची 'लंका 'जाळली? डहाणूत मोठा उलटफेर, प्रतिष्ठेच्या लढतीत कोणाचा गुलाल उधळला?
मतदारांनी कोणाची 'लंका 'जाळली? डहाणूत मोठा उलटफेर, प्रतिष्ठेच्या लढतीत कोणाचा गु
  • मतदारांनी कोणाची 'लंका 'जाळली? डहाणूत मोठा उलटफेर, प्रतिष्ठेच्या लढतीत कोणाचा गु

  • मतदारांनी कोणाची 'लंका 'जाळली? डहाणूत मोठा उलटफेर, प्रतिष्ठेच्या लढतीत कोणाचा गु

  • मतदारांनी कोणाची 'लंका 'जाळली? डहाणूत मोठा उलटफेर, प्रतिष्ठेच्या लढतीत कोणाचा गु

View All
advertisement