दरम्यान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , संबंधित घटना २२ जुलै रोजी पिंपरी शहरातील सांगवी परिसरातील देवकर पार्कमधील एका खोलीत घडली. मयत तरुण ज्ञानेश्वरचे त्याच्याच नात्यात असलेल्या एक तरुणीशी प्रेमसंबध होते. मात्र , मुलाचा स्वभाव आणि पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची असल्याच्या संशयावरून तरुणीच्या घरच्यांनी दोघांच्या लग्नाला विरोध केला.
मात्र दोघेही लग्न करण्यावर ठाम असल्याने अखेर तरुणीच्या घरच्यांनी ज्ञानेश्वरला लग्नाची बोलणी करायची आहे म्हणून बोलावले. त्यानुसार ज्ञानेश्वर आपल्या आई वडिलांसोबत बोलणी करण्यासाठी मुलीच्या नातेवाईकांच्या घरी गेला. मात्र तिथे दोन्ही कुटुंबियात वाद झाले, त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या मुलीच्या वडिलांनी आणि तेथील इतरांनी ज्ञानेश्वरला एका खोलीत नेऊन त्याच्या गुप्तांगावर आणि डोक्यात आणि इतर ठिकाणी बेदम मारहाण केली. या घटनेत जखमी झालेल्या ज्ञानेश्वरला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र शर्थीचे प्रयत्न करूनही डॉक्टर त्याला वाचवू शकले नाही.
advertisement
हा संपूर्ण प्रकार सांगवी पोलिसांना कळला तेव्हा त्यांनी ज्ञानेश्वरच्या कुटुंबीयांनी केलेल्या तक्रारीनंतर गुन्हे दाखल करत ज्ञानेश्वर घेंगटला जबर मारहाण करून त्याचा खून केल्याप्रकरणी तरुणीचे वडील, प्रशांत सारसर , करण खोकरसह अन्य ११ जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले असून फरार आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती सांगवी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र कोळी यांनी दिली आहे.