अधिवेशनात विरोधी पक्षनेत्यांकडून भाजपवर प्रश्नांची सरबत्ती सुरू असतानाच महाविकास इतर नेत्यांनीही प्रफुल्ल पटेलांवरुन भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न केलाय.. दाऊदचा साथीदार असलेल्या इकबाल मिर्चीसोबत संबंध असणारे प्रफुल्ल पटेल तुम्हाला चालतात का? असा सवाल महाविकास आघाडीनं फडणवीस आणि भाजपला केलाय. विरोधकांच्या या आरोपांना पटेलांमागे लागलेल्या चौकशीचा ससेमिरा कारणीभूत आहे.
'भुजबळ मुख्यमंत्री होवोत, नाहीतर...', पोस्टरबाजीवरून जरांगे पाटलांचा निशाणा
पटेलांचं इकबाल मिर्चीप्रकरण काय आहे?
वरळी येथील इक्बाल मिर्चीचा ताबा असलेल्या इमारतीच्या पुनर्बांधणीचा काम पटेल यांच्या कंपनीने केले होते. पटेल यांच्याकडून यासाठी मिर्ची आणि त्याच्या कुटुंबाला रोख रक्कम आणि काही जागा देण्यात आली. याच व्यवहारत गैरप्रकार झाल्याचा ईडीला संशय आहे. या प्रकरणी प्रफुल्ल पटेल यांची दोनवेळा ईडीकडून चौकशीही झाली, तसंच पटेलांच्या वरळीतील घरावर ईडीकडून कब्जाही करण्यात आला.
महाविकास आघाडीकडून या मुद्द्याला धरुन भाजप आणि प्रफुल्ल पटेलांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न होतोय, त्यामुळे भाजपनं याप्रकरणी सावध भूमिका घेतल्याचं पाहायला मिळतंय. दुसरीकडे प्रफुल्ल पटेलांनी मात्र विरोधकांचे हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
देवेंद्र फडणवीसांनी पत्र सोशल मीडियावर शेअर करत मलिकांना विरोध केला, यावरुन अजित पवार गटात नाराजी पसरल्याची चर्चा आहे. पण, यातच आता विरोधकांनी मलिकांविरोधातील याच पत्राचा आधार घेत, आता प्रफुल्ल पटेलांवरुन भाजपवर निशाणा साधलाय, त्यामुळे अधिवेशनाच्या दोन दिवसात राष्ट्रवादीच्या 2 नेत्यांमुळे भाजपची कोंडी झाल्याचं पाहायला मिळालं, त्यामुळे फडणवीसांच्या पत्रामुळे सुरू झालेलं हे राजकारण पुढे काय वळण घेतं? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.